मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा कोरोना पश्चात गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देशासह महाराष्ट्रातील राजकारणावर, जातीयवादी आणि धर्मवादी राजकारणावर, तसेच महाराष्ट्रात मंत्र्यांच्या बाहेर येत असलेल्या घोटाळ्यासंदर्भात चौफेर टोलेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राज ठाकरेंनी लक्ष्य केल्याचे दिसून आले.
दरम्यान राज ठाकरे म्हणाले, ''नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांकडे लक्ष देण्याचा आवाहन केलं होतं. मात्र आता उत्तरप्रदेशमध्ये विकास होतोय हे ऐकूण बरं वाटलं. जेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस जन्म झाला, तेव्हा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरु झालं. ज्या शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा विढा उचलला तेव्हा त्यांनी कोणत्याही मावळ्याची जात पाहीली नव्हती. महाराजांनी आपल्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने गुढी उभारली होती. परंतु आज राजकीय पुढारी आपल्याला जाती-पातीच्या राजकारणात अडकवत चालले आहेत. देशातील प्रत्येक राज्य एकमेकांना ओरबाडण्याचा प्रयत्न करत आहे. सगळेचजण विकासाच्या नावावर भांडत आहेत.
महाराष्ट्रात आज गुढीपाडव्याचा उत्सव उत्साहात साजरा होत आसताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन राज्यातील ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर घणाघात केला. पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र हे आर्थिक संपन्न राज्य आहे, मात्र वाढत्या स्थलांतरामुळे राज्यासह मुंबईत बकालपणा वाढत असल्याची जाणीव राज्यातील सत्ताधीशांना राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून करु दिली.
राज ठाकरे म्हणाले, ''नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा मी उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्याचं आवाहन केल होतं. मात्र आता उत्तरप्रदेशचा विकास होत आहे हे ऐकून बरं वाटलं. परंतु दुसरीकडे देशातील राज्यांराज्यामध्ये विकासाच्या नावावर स्पर्धा सुरु झाली आहे. उत्तरेतील राज्यांमधून लोक मोठ्याप्रमाणात स्थलांतर करुन महाराष्ट्रासह मुंबईत येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात झोपडपट्ट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू आणखी वाढू लागले आहे.''
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.