वाचनाची आवड असलेल्यांसाठी पर्वणी; अवघ्या ३० रुपयांत मिळणार पुस्तकांचा खजिना

The Asiatic Society of Mumbai Books Exhibition : ३० रुपयांत एक पुस्तक (Book) आणि २० रुपयांत एक नियतकालिक (magazine) विकत घेता येणार आहे.
The Asiatic Society of Mumbai
The Asiatic Society of Mumbaifacebook/@AsiaticMumbai
Published On

मुंबई: वाचनाची आवड असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील एशियाटिक सोसायटी (The Asiatic Society of Mumbai) या संस्थेद्वारे वाचकांना (Readers) उत्तम पुस्तकं (Books) विकत घेता येणार आहेत. तेही अवघ्या ३० रुपयांत! आहे ना ही मोठी गुडन्यूज. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या व्यवस्थापकीय समितीने ही घोषणा केली आहे. गुरुवार, ५ मे पासून ते बुधवार, १८ मे पर्यंत (रविवार वगळून) सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दरबार हॉलमध्ये हे भव्य पुस्तक प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. (Good News For Readers! the asiatic society of mumbai will sell books in a very cheap price)

हे देखील पाहा -

व्यवस्थापकीय समितीने २१ एप्रिल 2022 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार एएसएम लायब्ररीला (The Asiatic Society of Mumbai) दान केलेल्या, परंतु वर्षानुवर्षे विविध कारणांमुळे अयोग्य आढळलेल्या पुस्तकांची विल्हेवाट लावण्याबाबत चर्चा झाली. अनेक प्रयत्न करूनही देणगीदारांनी पुस्तके दान केलेली परत घेतली नाहीत. त्यामुळे अशा पुस्तकांची विक्री अतिशय माफक दरात करण्यात येणार आहे. एशियाटिक सोसायटी दरबार हॉलमध्ये (Darbar Hall) ५ मे, गुरुवारपासून ते १८ मे २०२२ बुधवारपर्यंत (रविवार वगळून) हे भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच याचदरम्यान सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६ या वेळेत पुस्तके विकतही घेता येतील. यासाठी या संस्थेचे सदस्य असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही सदस्यांना टोकन रकमेवर ही पुस्तके खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. यात केवळ ३० रुपयांत एक पुस्तक (Book) आणि २० रुपयांत एक नियतकालिक (magazine) विकत घेता येणार आहे. त्यामुळे वाचकांना एक प्रकारे पुस्तकांचा खजिनाच मिळणार आहे.

NOTICE 28TH APRIL 2022 By The Asiatic Society of Mumbai
NOTICE 28TH APRIL 2022 By The Asiatic Society of MumbaiThe Asiatic Society of Mumbai

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईबद्दल संक्षिप्त माहिती

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई (पूर्वीची एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे) ही मुंबईतील (Mumbai) आशियाई अभ्यास क्षेत्रातील एक विद्वान संस्था आहे. २६ नोव्हेंबर १८०४ रोजी मुंबईत सर जेम्स मॅकिंटॉश यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची स्थापना केली. "उपयुक्त ज्ञानाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने या सोसायटीची स्थापना करण्यात आली.

१८०४ मध्ये जेव्हा सोसायटीची स्थापना झाली तेव्हा त्याची उद्दिष्टे आणि उद्दिष्टे होती "उपयुक्त ज्ञानाचा प्रसार करणे विशेषतः जसे की आता भारताशी त्वरित जोडलेले आहे". त्यानंतर, अनेक प्रसंगी, भाषा, तत्त्वज्ञान, कला आणि नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रे यांच्या भारत आणि आशियाच्या संबंधात संशोधन अभ्यासांना प्रोत्साहन देणे, जर्नल्स प्रकाशित करणे, ग्रंथालय आणि संग्रहालयाची देखभाल करणे, संस्था स्थापन करणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत. (The Asiatic Society of Mumbai Books Exhibition And Sell News)

The Asiatic Society of Mumbai
Heatstroke: उन्हाळ्यात उष्माघातापासून कसा बचाव करावा? जाणून घ्या कारणे, लक्षणे अन् उपाय...

पुस्तकांचा महासागर

एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात एक लाखांहून अधिक पुस्तके असून त्यापैकी १५,००० पुस्तके दुर्मिळ आणि मौल्यवान पुस्तके आहेत. त्यात फारसी, संस्कृत आणि प्राकृत भाषेतील अमूल्य कलाकृती आणि ३००० हून अधिक प्राचीन हस्तलिखिते आहेत. ११,८२९ नाण्यांच्या संग्रहामध्ये कुमारगुप्त प्रथमचे सोन्याचे नाणे, अकबराचा दुर्मिळ सोन्याचा मोहूर आणि शिवाजी महाराजांनी जारी केलेली नाणी यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या नकाशा संग्रहात १३०० नकाशे आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com