Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी, पाणीकपातीबाबत महापालिकेचा मोठा निर्णय

BMC Water Supply News: पाणीकपातीची धास्ती धरून बसलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईकरांवरील संभाव्य पाणीकपात तुर्तास टळली आहे.
BMC Water Supply News
BMC Water Supply NewsSaam TV
Published On

BMC Water Supply News Today in Marathi

पाणीकपातीची धास्ती धरून बसलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईकरांवरील संभाव्य पाणीकपात तुर्तास टळली आहे. कारण, राज्य सरकारने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पाणी कपात होणार नाही, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BMC Water Supply News
Rain Alert: मुंबई-पुण्यासह 'या' भागांना आज मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा...

मुंबई शहराला तानसा, मोडक सागर (वैतरणा), मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. यातील तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा ही पाच धरणे मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहेत.

तर भातसा आणि अप्पर वैतरणा ही दोन धरणे राज्य सरकारच्या मालकीची आहेत. ही दोन धरणे बांधताना केलेल्या भांडवली खर्चाच्या सहभागामुळे पालिकेला या धरणातून पाणी मिळते. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये केवळ ४३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. (Latest Marathi News)

गेल्या वर्षी मार्च महिन्यात हा पाणीसाठा जवळपास ५५ टक्के इतका होता. यंदा त्यात मोठी घट झाल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. त्यामुळे १ मार्चपासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढलं होतं.

हीच बाब लक्षात घेता, भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा मिळावा अशी मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारने महापालिकेची ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपातीचं संकट तुर्तास टळलं आहे.

दरम्यान, ही पाणी कपात टळलेली असली तरी पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत सध्या १५ टक्के पाणी कपात सुरू आहे. येत्या ५ मार्चपर्यंत ती कायम राहणार आहे, असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

BMC Water Supply News
Gas Cylinder Price: मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, वाचा नवे दर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com