Mumbai News : मुंबईकरांसाठी खूशखबर! कुर्ला-कलिना आता विनासिग्नल

कुर्ला, कलिना, वांद्रे-कुर्ला संकुल बीकेसीया परिसरातील कार्यालयात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता विनासिग्नल आणि वेगवान होणार आहे.
Mumbai News
Mumbai News Saam Tv
Published On

Mumbai Latest News : कुर्ला, कलिना, वांद्रे-कुर्ला संकुल बीकेसीया परिसरातील कार्यालयात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता विनासिग्नल आणि वेगवान होणार आहे. बहुप्रतीक्षित विस्तारित सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पहिला टप्पा फेब्रुवारीत खुला होणार आहे. यामुळे शहरातील अति कोंडीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या कुर्ला-कलिना रस्त्यावरील अंतर वेगाने पार करता येणार आहे.

Mumbai News
Prabhakar More: हास्यजत्रेतला 'कोकणचा पारसमणी' प्रभाकर मोरेची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षात केला प्रवेश

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला मार्गावर ‘एससीएलआर’चे काम सुरू असल्याने अनेक खड्डे खोदण्यात आले होते. त्यामुळे कलिना ते कुर्ला (Kurla) दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

अशातच जुन्या गाड्यांचे भंगार आणि प्लायवूडची दुकाने आणि वाहन गॅरेज यांमुळे अर्धा रस्ता व्यापला जात असल्याने या परिसरातून कामावर जाणाऱ्या नोकरदारांना आणि पादचाऱ्यांना सध्या मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Mumbai News
Chandrashekhar Bawankule : सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागतच; बावनकुळेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

मात्र फेब्रुवारी मध्ये हा उड्डाणपूल खुला होणार असून आता या उडान पुलावर ट्रायल देखील होत आहे. त्यामुळे लवकरच प्रवाश्यांना प्रवास सुखकर होणार आहे. रस्त्यांवरील वाहने थेट पुलावरून जाणार असल्याने पादचाऱ्यांना चालण्यास काहीअंशी मोकळी वाट निर्माण होणार आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com