Mumbai Local Train: लोकलमधील रेटारेटीपासून होईल सुटका,प्लॅटफॉर्मची वाढणार क्षमता

Mumbai Local Train Big Update: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६च्या विस्तारासाठी आरआरआय इमारत पाडण्यात येणार आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local Train Big Updatesaam tv
Published On

सर्वाधिक गर्दी असलेली सर्वाजनिक वाहतूक व्यवस्था मुंबईच्या लोकल ट्रेनची असते. या मार्गावरील मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांची वाढती संख्या पाहून लोकल रेल्वेतील डब्यांची संख्या वाढवण्यात आली असून लोकलमध्ये १५ डबे असणार आहेत. या लोकलकरिता प्लॅटफॉर्मची क्षमता वाढविण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६च्या विस्तारासाठी अडसर ठरणारी जुनी रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) इमारत पाडण्यात येणार आहे. रेल्वे रुळाचं विस्तारीकरण झाल्याने १५ डब्यांच्या लोकल ट्रेनच्या मुख्य मार्गावरील २२ अतिरिक्त सेवांसह एकूण ४४ फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत, याबाबतची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

Mumbai Local Train
Mumbai AC Local: मध्य रेल्वेला मिळणार नवी एसी लोकल, प्रवाशांना बसण्यासाठी खास सोय; काय आहेत वैशिष्ट्ये?

मध्य रेल्वेने सीएसएमटी येथील सिग्नलिंग यंत्रणा अपडेट करून तेथे इलेक्ट्रिकल इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू करण्यात आलीय. सिग्नलिंगचे सर्व कामकाज प्लॅटफॉर्म १८ जवळच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आहे. त्यामुळे सिग्नलिंगची जुनी आरआरआय इमारत रिकामी झाली असून ती इमारत पाडण्यात येणार आहे.

Mumbai Local Train
Mumbai Local : हलता येई ना, उतरता येईना; ऐन पुलावर ट्रेन बंद पडल्यानं प्रवाशांची गैरसोय, नेरुळ-उरण लोकल सेवा ठप्प

ही इमारत पा़डल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ जवळची सुमारे ४०० चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. प्लॅटफॉर्म ५ आणि ६ ची लांबी वाढवण्यासाठी या जागेचा उपयोग होईल. यासाठी ११ कोटी ११ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी १०० मीटरने वाढणार आहे. सध्या हे दोन्ही प्लॅटफॉर्म प्रत्येकी २९० मीटर लांबीचे असणार आहेत. त्यांची लांबी ३९० मीटर इतकी होणार आहे.

प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने लोकलमध्ये अनेक बदल करण्यात आलेत. इतकेच नाही तर लोकल धावण्याचा वेळेत बदल केले जाणार आहेत. लवकरच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत मोठे बदल दिसणार आहेत. लोकलमध्ये प्रवाशांना उभं राहण्यास जागा नसते. या गोष्टीची दखल घेत रेल्वे प्रशासन लोकलची डिझाइन बलण्यात येणार आहे. लोकलच्या डब्यातील रुंदी वाढवण्यात येणार आहे. यामुळे नव्या डब्यांची रचना अधिक मोकळी असणार आहे. म्हणजेच सध्याच्या ईएमयू लोकलच्या तुलनेत नव्या डब्यामध्ये जास्त जागा असणार असेल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com