gold silver rate price today
gold silver rate price todaysaam tv

Gold Silver rate Price Today: ४८ तासांमध्ये २ हजारांनी वाढला सोन्याचा भाव; पाहा सोनं-चांदीचे दर

Gold Silver rate Price Today: सोन्याच्या भावात प्रति तोळा दोन हजार रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कसे आहेत सोनं आणि चांदीचे दर ते पाहूयात.
Published on

गेल्या महिनाभरापूर्वी सोन्या चांदीच्या भावात कपात झाली होती , मात्र अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजाचे दर यामुळे दोनच दिवसात चांदीच्या भावात प्रति किलो जवळपास ७ हजारांची वाढ झालीये. याशिवाय तर सोन्याच्या भावातही प्रति तोळा दोन हजार रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या १९९१ नंतर म्हणजे साडे तीन दशकांत अत्यंत कमी कालावधीत म्हणजे दोन दिवसात ही सर्वात मोठी वाढ आहे. संपूर्ण देशात खामगाव इथल्या चांदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. आता खामगाव इथल्या बाजारपेठेत चांदी ९१००० रू प्रति किलो तर सोने ७५२०० रू प्रति तोळे मिळतंय. मात्र ही दरवाढ दिवाळी पर्यंत स्थिरावेल असं चांदीच्या व्यापाऱ्यांना वाटतंय.

gold silver rate price today
Gold Silver Rate (27th September): मोठ्या उसळीनंतर सोन्याचा भाव आपटला, तर चांदीच्या दरातही झाली घसरण, वाचा आजचे नवे दर

मुंबईमध्ये कसे आहेत सोन्याचे भाव?

आज देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 75000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यावेळी मुंबईमध्ये सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 74,890 रुपये इतकी आहे. तर गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची वाढ पाहायला मिळते.

चांदीचे भाव

केवळ सोनं नाही तर चांदीच्या किमतीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एका आठवड्यात चांदीची किंमत 7500 रुपयांनी वाढली आहे. सध्या ते 92,000 रुपये प्रति किलो आहे.

सध्या गणपतीचे दिवस असून सोन्याचा भाव वधारल्याचं दिसून येतंय. शिवाय सणासुदीत नवीन विक्रमाकडे दोन्ही धातूंची घौडदौड सुरू झाली आहे. आगामी दिवाळीमध्येही अशीच परिस्थिती राहणार की सोन्याचा भावात घसरण होणार हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com