Ambarnath : पोलीस स्टेशनजवळच सोनसाखळी चोरी; अंबरनाथ पोलीसांना चोरट्यांचं चॅलेंज?

Gold Chain Snatching In Ambernath : ज्याठिकाणी ही सोनसाखळी चोरीची घटना घडली त्या ठिकाणाहून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे.
Gold Chain Snatching In Ambernath
Gold Chain Snatching In AmbernathSaam Tv
Published On

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये (Ambarnath) सोनसाखळी (Chain Snatching) चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अंबरनाथमधील शिवाजीनगरच्या रायगड बिल्डिंगसमोर एका विद्यार्थिनीची सोनसाखळी खेचून चोरटा पळून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी ही सोनसाखळी चोरीची घटना घडली त्या ठिकाणाहून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये चोरट्यांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होतोय. (Gold Chain Snatching In Ambernath)

हे देखील पाहा -

शिवाजीनगरच्या मधल्या आळीत राहणारी संस्कृती जाधव ही विद्यार्थिनी मंगळवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास तिच्या एका मैत्रिणीसोबत क्लासहून पायी घरी परतत होती. यावेळी एक चोरटा रोटरी क्लबपासून संस्कृतीचा पाठलाग करत होता. शिवाजीनगरमध्ये नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या कार्यालयासमोरून जातानाही हा चोरटा या विद्यार्थिनीच्या अगदी मागेमागे चालत असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. यानंतर काही पावलं पुढे जाताच हा चोरटा तरुणीच्या पुढे गेला आणि तिचं तोंड दाबून तिच्या गळ्यातली सोनसाखळी ओढत पळून गेला. यावेळी संस्कृतीने आरडाओरडा केल्यानं दोन जण या चोरट्याच्या मागेही धावले, मात्र हा चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्यासह सुरक्षात्मक उपायोजना करण्याची मागणी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केली आहे.

Gold Chain Snatching In Ambernath
वाळूचे टिप्पर सोडवण्यासाठी २१ हजारांची लाच; पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला

धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे. दोनच दिवसांपूर्वी कानसईत महिला डॉक्टरची सोनसाखळी खेचून नेल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर ही सलग दुसरी घटना आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरांनी पोलिसांना थेट आव्हान दिल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तूर्तास यावर काहीही बोलायला नकार दिला आहे. त्यामुळे अंबरनाथ पोलिसांना चोरट्यांनी एकप्रकारे आवाहन दिलं आहे. मात्र यामुळे अंबरनाथमध्ये चोरट्यांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होतोय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com