12 MLA Suspension: सरकार स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे सर्व करतंय - गिरीश महाजन

सूडबुद्धीने केलेला हा निर्णय होता. आज सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिलेली आहे.
12 MLA Suspension
12 MLA SuspensionSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या 12 आमदारांच्या (MLA) निलंबनाविषयी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आज मोठा निर्णय दिला. वर्षभराकरिता निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या (BJP) सर्व 12 आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) रद्द केले आहे. त्यावरुन आता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केलीये (Girish Mahajan Slams Mahavikas Aghadi After Supreme Court Cancel 12 MLAs Suspension).

12 MLA Suspension
Suspension Of 12 BJP MLAs : भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं निलंबन रद्द | SAAM TV

सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली आहे - गिरीश महाजन

"सभागृहाच्या बाहेर जो वाद झाला त्यामुळे 12 आमदारांचे (MLA) निलंबन केले होते. सूडबुद्धीने केलेला हा निर्णय होता. आज सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिलेली आहे. भास्कर जाधव स्वतःला सुप्रीम कोर्टाच्या वर समजतात. त्यांनी त्यावेळी संयम दाखवला असता तर तसा प्रांग आला नसता", असं म्हणत गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhao) यांच्यावर टीका केली आहे.

12 MLA Suspension
12 MLA's Suspension Cancelled: "हा निर्णय महाभकास आघाडी सरकारचे थोबाड फोडणारा"

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बाजूने जर निर्णय झाला. तर त्याचे स्वागत आणि झाला नाही तर टीका करतात. यांना यांच्या आमदारावर विश्वास नाही, म्हणून हे निलंबनकेले. भीतीने वर्षभराचे निलंबन केले. याआधी असे कुणी केले नव्हते. तुम्हाला लोकशाहीची पायमल्ली करून चालणार नाही. सरकार स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे सर्व करत आहे. सर्व बाबतीत आतापर्यंत न्यायालयाने यांच्या बाजूने निर्णय दिला नाही.

12 MLA Suspension
12 MLA Suspension Cancelled: भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं निलंबन रद्द,मविआला धक्का भाजपला दिलासा, पाहा सविस्तर बातमी

स्वतःचे खिसे गरम करत आहेत - गिरीश महाजन

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) दोन वर्षे झालेत घरात बसले आहेत. राज्यात वाऱ्यावरची वरात सुरू आहे. तुम्ही आता किराणा दुकानात देखील वाईन सुरू केली. सर्वांना लायसन्स देऊन स्वतःचे खिसे गरम करत आहेत. आम्ही म्हणतो पेट्रोलवरचा टॅक्स कमी करा पण ते करणार नाही. इतके महत्वाचे प्रश्न असताना निर्णय घेत नाहीत", अशी टीका त्यांनी केलीये.

गोव्याचे निकाल आल्यावर कळेल की शिवसेनेला तिथे कुत्र ओळखत नाही, असाही घणाघात गिरीश महाजन यांनी केला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com