तळेगाव शहरात पसरली गॅस्ट्रोची साथ; आजाराने नागरिक बेजार, रुग्णालये झाली तुडूंब!

एकीकडे संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली असताना तळेगावकरांना मात्र गॅस्ट्रोच्या समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे.
Gastro
Gastro SaamTvNews
Published On

मावळ : तळेगाव शहरात होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा व हवमानात सतत होत असलेले बदल यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात  जुलाब उलट्या व सर्दी खोकल्याची साथ पसरली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक आजारी पडू लागल्याने शहरातील रुग्णालये (Hospitals) भरली आहेत. प्रशासनाकडून हा काय प्रकार आहे याची शोध मोहिम सुरु करण्यात आली असून पाण्याच्या टाक्यांसह नागरिकांच्या घरातील पाण्याचे (water) नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हे देखील पहा :

तपासणीनंतर पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी घराच्या नळामधून होत असलेल्या अशुद्ध पाण्यामुळेत तळेगाव शहरात जुलाब उलट्याची साथ पसरली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.  मागील आठवडाभरापासून तळेगाव शहरात जुलाब उलट्यांच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्या वाढली आहे. या संदर्भात तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तळेगाव नगर परिषद हद्दीतील नागरिकांचे घरटी सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येत आहे, तळेगाव शहरात भूयारी गटार योजना व सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेतील कामात तळेगाव नगर परिषद प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.

Gastro
Pune : सांगवीत ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटर मध्ये सुरु होते सेक्स रॅकेट !

त्यामुळे तळेगावकर नागरिकांवर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.  मागील सहा महिन्यांपासून तळेगावात भुयारी गटर योजना व पाणीयोजना यांची कामे सुरु आहेत. ही कामे करत असताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तीस  डिसेंबर पासून तळेगावात जुलाब व उलट्याची साथ (Infection) पसरली आहे. तळेगावातील जवळपास 70 ते 80 टक्के नागरिकांना ही लागण झाली असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले असून सर्व रुग्णालये गच्च झाली आहे.

कोरोना (corona) व लाॅकडाऊन (lockdown) मुळे नागरिक आर्थिक संकटात सापडलेले असताना ही नविन साथ शहरात पसरल्याने सर्वसामान्यांचे वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी मोठे हाल होत आहेत. घरामध्ये फिल्टर असून देखील सहा रुग्ण आहेत. इतके हे पाणी खराब व अशुद्ध आहे. प्रशासनाकडून तात्काळ ही समस्या सोडवत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Gastro
थर्टी फर्स्ट ची पार्टी पडली महागात; चार मित्रांनी केला मित्राचाच खून!

दररोज नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून व गाळून प्यावे. जलशुद्धीकरण प्रकल्प व पाणीसाठवण टाक्याचे नमुने तपासले असता ते पाणी पिण्यायोग्य असल्याचा अभिप्राय आला आहे. त्यामुळे नळजोड व अन्य कोठून पिण्याच्या पाण्यात दुषीत पाणी जायंत का याची शोध मोहिम युद्ध पातळीवर सुरु आहे. तुर्तास तरी नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. 

Gastro
Pune : ४० फुटांवरून लोखंडी सळई निसटली आणि १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर पडली; मुलाचा जीव धोक्यात !

एकीकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मावळ मध्ये गॅस्ट्रोचे रुग्ण देखील मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे तळेगाव नगरपरिषदेला कोरोना बरोबरच गॅस्ट्रो ची साथ आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com