अजय दुधाणे
अंबरनाथ शहरात घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहायला मिळतंय. नगरपालिका प्रशासन आणि कचरा उचलणारा ठेकेदार यांच्यातल्या आर्थिक वादाचा फटका थेट सामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय.
अंबरनाथ नगरपालिका आणि ठेकेदार यांच्यातील आर्थिक गणितं बिघडल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पालिका आणि ठेकेदार यांच्यातील वादामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिक त्रस्त झालेत.
अनेक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारची कचराकुंडी नसल्याने नागरिक मिळेल तिथे कचरा टाकून निघून जातायत. अशाच प्रकारे पश्चिमेच्या कोहजगाव परिसरातून कमलाकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेत असून या ठिकाणी देखील कचराकुंडी नसल्याने नागरिक मिळेल तिथे कचरा टाकून निघून जातायत. त्यामुळे नागरिकांना रहदारीस अनेक अडचणी निर्माण होत असून शेजारच्या दुकानदारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.
पालिकेने या ठिकाणी कचराकुंडी ठेवल्यास नागरिक त्या कचरा कुंडीत कचरा टाकतील मात्र पालिकेच्या माध्यमातून कचरा टाकण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने नागरिक देखील मिळेल तिथे कचरा टाकून निघून जात असल्याने स्थानिक दुकानदार त्रस्त झालेत.
तर याच परिसरात नाला बनवताना पाणी वाहून जाण्यासाठी योग्य उतार नसल्याने नाल्यात पाणी तुंबुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. सांडपाणी तुंबून नाल्यात मच्छरांची पैदास वाढलीये त्यामुळे परिसरात रोगराई पसरत असल्याने पालिकेविरोधात नागरिक संताप व्यक्त करतायेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.