Ambernath Shiv Mandir: अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ambernath News: ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
Ambernath Shiv Temple News
Ambernath Shiv Temple NewsSaam Tv
Published On

CM Eknath Shinde On Ambernath Shiv Temple:

ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ambernath Shiv Temple News
Pm Modi On Deepfak: 'हे डीपफेकचे युग आहे, आवाजही बदलता येतो' लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींनी मंत्र्यांना केलं सावध

वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन शहराचा विकास करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडणार नाही. राम जन्मभूमी येथे राम मंदिराची निर्मिती करून करोडो भारतीयांचे स्वप्न साकार केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचे अभिनंदन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.  (Latest Marathi News)

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले/ त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

Ambernath Shiv Temple News
Railway Crime News: जनरल तिकीट घेऊन एसी कोचमध्ये चढली महिला, संतापलेल्या टीटीईने केलं असं कृत्य, जाणून बसेल धक्का

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास राज्य शासनामार्फत विकास कामे सुरु आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानेही स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच इतर विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.

ते म्हणाले की, अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठाता देखील नियुक्त करण्यात आले आहेत. कळवा येथील रुग्णालयामधील कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजीच्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार आहेत. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केल्याचा आवर्जून उल्लेख करुन मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com