
पुणे : बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड तयार करून दुसऱ्यांच्या दुर्लक्षित जमिनी परस्पर विकणाऱ्या टोळीला पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) खंडणी विरोधी पथकाने गजाआड केल आहे. दुसऱ्यांच्या दुर्लक्षित, पडीक जमिनीच्या मालकांची महसूल विभागातून तसेच गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून माहिती घेऊन, त्या जमिनीच्या मालकाचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड तसेच बनावट कागद पत्रांच्या साह्याने बँकेत खाते उघडून, दुसऱ्याची जमीन परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला पुणे शहर खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
कल्पेश रमेश बोहरा अस या टोळीचा मुख्य सूत्रधाराचं नाव आहे. कल्पेश रमेश बोहरासह खंडणी विरोधी पथकाने उमेश जगन्नाथ बोडके, अमोल गोविंद ब्रम्हे, सचिन दत्तात्रय जावळकर, सय्यद तालीब हुसेन, प्रदीप अनंत रत्नाकर आणि मोहम्मद आसिफ मोहम्मद युनुस अशा एकूण सात आरोपींना अटक केली आहे.
हे देखील पाहा -
अटक करण्यात आलेल्या टोळी कडून खंडणी विरोधी पथकाने लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, बनावट शिक्के बनवण्याची मशीन, आठ मोबाईल (Mobile) बनावट नावाने घेतलेली सिमकार्ड, बनावट रित्या तयार केलेले इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, बँक पासबुक आणि इतर बनावट कागदपत्रे अशी साहित्य जप्त केलं आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने मुळशी तालुक्यातील (Mulshi taluka) एक भूखंड मुंबईतील एका व्यक्तीला सात लाख हदा हजार रुपयात विकला असल्याचं ही पोलिस तपासात उघडकीस आल आहे.
या टोळीतील मुख्य सूत्रधार कल्पेश रमेश बोहरा आणि त्याचे इतर प्रॉपर्टी एजेंट सहकारी इतरांच्या दुर्लक्षित जमिनीची परस्पर विक्री तर करतच होते, त्यासोबत ते आपल्या देशात अवैध मार्गाने येणारे घुसखोर, समाज विघातक कृत्य करणारा व्यक्ती, तसेच ते लँड माफिया यांना हवाला द्वारे पैशाचे व्यवहार करण्याकरिता बनावट कागदपत्र देखील तयार करून देत असल्यास पोलिस तपासात निष्पन्न झाल आहे. त्यामुळे तुमची जर पुणे शहर किंवा इतर कोणत्याही भागात कुठेही मोकळी, दुर्लक्षित जमीन असल्यास तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.