
जळगाव : शहरातील फुले मार्केटमधील बाबूजी फुटवेअरच्या मालकाने व्याजाने घेतलेल्या ६० हजार रुपयांच्या मोबदल्यात चक्क १ लाख ९१ हजार ५०० रुपये अवैध सावकारांनी वसूल केले. व्याजाच्या नावाने तिप्पट पैसा उकळूनही आणखी पैशांसाठी धमकावत असल्याची तक्रार संबंधित व्यापाऱ्याने शहर पोलिस (Police) ठाण्यात दिली आहे. (jalgaon news Persecution of merchants by moneylenders police case)
जळगाव (Jalgaon) शहरातील फुले मार्केटमधील बाबूजी फुटवेअरचे मालक सनी इंद्रकुमार साहित्या (वय २६, रा. इच्छादेवी मंदिरासमोरील स्वामी टॉवर) यांनी व्यवसायासाठी जैनाबाद येथील रूपेश सोनार व चिराग शिरसाठ यांच्याकडून १६ नोहेंबर २०२१ ला ६० हजार रुपये व्याजाने घेतले होते. घेतलेल्या रकमेपोटी साहित्या यांनी संबंधितांना व्याजासकट १ लाख ९१ हजार ५०० रुपये ऑनलाईन पैसे अदा केले. व्याजासकट पैसा परत करूनही मंगळवारी (ता. १७) चिराग शिरसाठ याने सनी साहित्या यांना दुकानावरून बोलावून नेले व रूपेश सेानार व चिराग यांनी आणखी व्याजाच्या पैशांची मागणी केली. त्यावर सर्व पैसे दिल्याचे सांगितल्याने सनी साहित्या यास दोघांनी बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सनी साहित्या यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध अवैध सावकारी प्रतिबंधक अधिनियम-२०१४ चे कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार रवींद्र सोनार तपास करीत आहेत.
सावकारीसाठी कुप्रसिद्ध
शहरातील काही रहिवासी वस्त्या सावकारीसाठी कुप्रसिद्ध असून, त्यापैकी जैनाबाद येथे अवैध सावकारीचा महापूरच आला आहे. प्रत्येक गल्लीत अवैध सावकारीचे धंदे असून, व्यापाऱ्यांना नाडून चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी करण्यात येत असल्याचे पोलिस चौकशीत आढळून आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.