महापालिका निवडणुकीत गणेश नाईकांनी शिंदेंचा टांगा पल्टी घोडे फरार करण्याचा इशारा दिला होता... मात्र निकालानंतरही शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही... त्यातच आता वनमंत्री गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंचं नामोनिशाण मिटवण्याची भाषा केलीय... तर नाईकांनी वारंवार आव्हान दिल्यास शांत बसणार नाही, असा इशारा शिंदेसेनेनं दिलाय...
खरं तर महायुतीची सत्ता आल्यापासूनच गणेश नाईकांना भाजपकडून शिंदेंविरोधात बळ दिलं जात असल्याची चर्चा आहे. नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेत शिंदेंना शह दिला होता. मनपा निवडणुकीत हा संघर्ष आणखी पेटला. नाईकांनी नवी मुंबई महापालिकेत एकहाती भाजपचे 65 नगरसेवक निवडून आणून शिंदेंवर मात केली. त्यानंतर ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजपला दूर ठेऊन शिंदेंनी सत्तेचं समीकरण जुळवल्यानं नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना आव्हान दिलंय. ठाणे जिल्ह्यातील वर्चस्वासाठीचा हा संघर्ष आनंद दिघेंपासून आहे...
1995 - ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरुन आनंद दिघे आणि नाईकांमध्ये ठिणगी
1999- नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर भोईरांना ताकद देत दिघेंकडून नाईकांचा पराभव
2004- पालकमंत्री असताना नाईकांकडून एकनाथ शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न
2009- गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईकांना खासदार बनवून शिंदेंना हादरा
2014- शिंदेंनी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंना ताकद देत नाईकांना पराभूत केलं
2019- पालकमंत्री असताना शिंदेंकडून नाईकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न
ठाणे जिल्हा परीषदेवरही भाजपचा झेंडा फडकवण्याच निर्धार नाईकांनी व्यक्त केलाय. त्यामुळे शिंदेंनी भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला तर आगामी काळात नाईक विरुद्ध शिंदे हा संघर्ष आणखी तीव्र होत कोणत्या वळणावर जाणार हे पाहणे महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.