दहावी परीक्षेचा धसका; परीक्षेला घाबरून विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा बनाव

अपहरणकर्त्यांची नजर चुकवून या तरुणीने तेथून पळ काढला आणि आपल्या वडिलांना याबाबत माहिती दिली.
Badlapur Police
Badlapur Policeअजय दुधाणे
Published On

बदलापूर - बदलापुरात (Badlapur) एका दहावीत असणाऱ्या विद्यार्थिनीने परीक्षा ऑफलाइन होणार असल्याने त्या त्रासातून स्वतःची सुटका व्हावी यासाठी आपल्या अपहरणाचा बनाव रचला सुरुवातीला चार व्यक्तींनी तिचेअपहरण केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, बदलापूर पोलिसांनी (police) कसून चौकशी केली असता या विद्यार्थिनीने परीक्षेला घावरून स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचे उघड झाले.

हे देखील पहा -

२३ फेब्रुवारीला बदलापूर पश्चिमेतील एक विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. चार व्यक्तींनी तिला बेशुद्ध करून अपहरण करून मुंबईला नेल्याचे म्हटले होते. अपहरणकर्त्यांची नजर चुकवून या तरुणीने तेथून पळ काढला आणि आपल्या वडिलांना याबाबत माहिती दिली. वडिलांनी दादर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अपहरणाचा प्रकार बदलापुरात घडल्याने दादर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास बदलापूर पोलिसांकडे वर्ग केला.

Badlapur Police
सलमान खानची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरचा युक्रेनला पाठिंबा, पुतिन यांना म्हटले क्रिमिनल

या अपहरणाचा तपास करीत असताना परळ भागातील काही सीसीटीव्ही पडताळण्यात आले. मात्र त्याठिकाणी अपहरणकर्ते न सापडल्याने पोलिसांना त्या तरुणीवर संशय येऊ लागला. त्यानुसार पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलत त्या तरुणीवर लक्ष केंद्रित केले.पोलीस निरीक्षक अंकुश म्हस्के यांनी त्या मुलीची कसून चौकशी केली असता,संबंधित तरुणीने अपहरणाचा बनाव केल्याचं तपासात उघड झाले. ही तरुणी दहावीत असून परीक्षा होणार असल्याने त्या अपहरणाचा बनाव रचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com