Mahaparinirvan Din 2022: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासून म्हणजे ५ डिसेंबरपासून ते ७ डिसेंबरपर्यंत भीम अनुयायांसाठी बेस्ट प्रशासनाकडून खास उपक्रम राबवण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. साेबतच मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. (Free trip to Ambedkar Tour Circuit in Mumbai)
महापरिनिर्वाण दिनासाठी (Mahaparinirvan Din 2022) मुंबईत येणाऱ्या अनुयायांना मुंबईत फिरता यावं, यासाठी 50-60 रुपयांचा पास बेस्ट प्रशासनाने जाहीर केला आहे. आजपासून (5 डिसेंबर ते 7 डिसेंबर) पुढील 2 दिवस चलो स्मार्ट कार्ड शिवाय हा पास उपल्बध असणार आहे. शिवाजी पार्क, चैत्यभूमी या ठिकाणी हे पास मिळणार असून अधिकाधिक लोकांनी हे पासेस खरेदी करावे असं आवाहन बेस्ट प्रशासनाने केलं आहे. (LIVE Marathi News)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' आयोजित करण्यात आली आहे. ३ डिसेंबरपासून ही सहल सुरू झाली असून ४, ७ आणि ८ डिसेंबरपर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे. सहलीसाठी दररोज ४ बसेस धावत आहेत. लोकांना फर्स्ट कम फर्स्ट आधारावर घेतले जात आहे.
या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करू शकतात. मुंबईत ऑनलाईन नोंदणीसाठी Dr. Babasaheb Ambedkar Tourism Circuit या लिंकवर क्लिक करा. तर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच ऑफलाइन नाव नोंदणीसाठी 7738375812 विक्रम किंवा रसिका 7738375814 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
पर्यटकांना सकाळी 9 वाजता दादर शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथून, चैत्यभूमी (Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak) आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल. त्यानंतर त्यांना बीआयटी चाळ क्र. 1 खोली क्र. 50/51 या ठिकाणी नेले जाईल. या सहलीची सांगता सिद्धार्थ कॉलेज, फोर्ट येथे होईल. दुपारी 2 च्या सुमारास दादरच्या गणेश मंदिराजवळ सहलीच्या सुरुवातीच्या ठिकाणी सोडण्यात येईल. (Breaking Marathi News)
बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे बीएमसी जिमखाना शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर येणाऱ्या सुमारे पाच लाख अनुयायांसाठी विनामूल्य जेवण देण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीपासूनच हे जेवण वितरित करण्याचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे इथे जेवण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना बसून व्यवस्थित पोटभर जेवण वाढण्यात येणार आहे.
स्थळ: शिवाजी पार्क पेट्रोल पंपाच्या बाजूला, बीएमसी जिमखाना मैदान
अधिक माहितीसाठी संपर्क : 9987373333 ( श्री. राम रेपाळे, माजी नगरसेवक, ठाणे महानगरपालिका)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.