किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मृत्यू

मूळची दिल्लीची असलेली रुचिका शेठ ठाणे आणि डोंबिवली मधील मित्रांसोबत पर्यटनासाठी आली होती.
किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मृत्यू
किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मृत्यूरोहिदास घाडगे
Published On

रोहिदास घाडगे

जुन्नर : कोरोनामुळे Corona पर्यटनास tourism बंदी असताना देखील भर पावसामध्ये Rain पावसाळी पर्यटनासाठी भटकंती करताना मित्रांसोबत किल्यावर Forts गेलेल्या तरुणीच्या मृत्यूची Death माहिती समोर आली आहे. जुन्नर Junnar तालुक्यामधील ऐतिहासिक नाणेघाट Naneghat जवळ जीवधन Jivadhan किल्ला बघून खाली उतरत असताना, दिल्ली राहत असलेली पर्यटक तरुणीचा पाय घसरून दरीत पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.

जुन्नर पोलीस Police ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये मृत तरुणीचे नाव रुचिका सेठ असे आहे. तिचे वय- ३० असून, ती दिल्ली Delhi ​या ठिकाणी राहत होती. रुचिका 31 जुलै दिवशी दिल्लीहून ठाणे येथील ओमकार बाईत यांचेकडे आली होती. ओमकार आणि रुचिका हे दोघे 3 ऑगस्ट दिवशी मोटार सायकलवरून कल्याण या ठिकाणी आले होते.

हे देखील पहा-

यानंतर डोंबिवली पूर्व या ठिकाणी राहत असलेला दिनेश रामकरण यादव आणि मंजू दिनेश यादव यांच्या सोबत मोटारसायकल वरून चौघेजण माळशेज घाट मार्गे नाणेघाट या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. त्यांनी ठिकाणी रात्री मुक्काम केला होता. सकाळी चौघेजण जीवधन किल्ला बघण्यासाठी गेले होते. किल्ला बघून परत येत असताना, ही दुर्घटना घडली आहे.

जखमी रुचिकाला जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. मात्र, त्या अगोदरच ती मृत झाली असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. नाणेघाट आणि जीवधन किल्ले परिसरामध्ये पावसाळ्यात जोरदार पाऊस पडत असतो. दाट धुके देखील त्याठिकाणी असतात. प्रचंड सोसाट्याचा वारा असतो. शिवाय शेवाळलेल्या वाटा असल्यामुळे पाय घसरून पडण्याच्या घटना घडतच असतात.

किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मृत्यू
विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू; तार तुटल्याने घडली घटना

ा किल्ल्यावर घसरून पडल्यामुळे जखमी झाल्याच्या अनेक घटना याअगोदर घडले आहे. मात्र, मृत झाल्याची ही पहिलीच धक्कादायक घटना आहे. पर्यटनास बंदी असताना, देखील नाणेघाट परिसर पावसाळी पर्यटनास येणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे.

पोलिसांच्या दंडात्मक कारवाईची भीती या ठिकाणी बाळगली जात नाही. गेल्या आठवड्यात तर पोलिसांना अरेरावीची भाषा वापरून कारवाईत अडथळा आणल्याचा आरोपावरून पुणे या ठिकाणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com