सुशांत सांवत
Amitabh kant News : जी२० परिषदेचे शेरपा अमिताभ कांत यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठं भाष्य केलं आहे. जी२० परिषदेच्या पत्रकार परिषदेत शेरपा अमिताभ कांत यांनी कोरोनात्तर भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे. 'कोरोनामुळे १० कोटी लोक दारिद्रय रेषेखाली गेले आहेत. त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. याशिवाय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून अनेकजण बाहेर गेले आहेत, असे मोठं भाष्य शेरपा अमिताभ कांत यांनी केलं आहे. (Latest Marathi News)
यंदा भारताला जी२० परिषदेचे यजमानपद मिळाले असून उद्यापासून जी२० परिषदेला सुरुवात होत आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या जी२० परिसषदेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? आणि या चर्चासत्रात कोणकोणते मान्यवर उपस्थित असतील?याबाबत सविस्तर माहिती जी२० परिषदेचे शेरपा अमिताभ कांत हे पत्रकार परिषदेतून दिली.
अमिताभ कांत म्हणाले, ' २००८ साली जागतिक मंदी होती. लंडनमध्ये झालेल्या परिषदेत मोठी मदत जाहीर करण्यात आली. जागतिक निधीत त्यावेळी वाढ केली. तसेच बुडीत कर्जांसाठी मोठी तरतूद केली'.
जी २० परिषदेवर भाष्य करताना अमिताभ कांत म्हणाले, 'जी २० परिषद ही शक्तीशाली आहे. कारण विकसित आणि विकसनशिल देशांना जोडते. ९० टक्के ग्लोबल पेटंट हे जोडलेले आहेत. जगाच्या ८५ टक्के जीडीपी हा जी२० सोबत आहे. देशातील प्रत्येक राज्य व केंद्र शासित राज्यासाठी ही मोठी संधी आहे'.
'हवामान, शाश्वत विकास अशी अनेक आव्हाने समोर आहेत. कोरोनामुळे ७० देशांच्या अर्थव्यवस्थांवर (Economy) परिणाम झाला आहे. पंतप्रधानांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
सर्व देशांचे राजकीय व आर्थिक विचार वेगळे असतील, पण ध्येय एक आहे. आपण जगात एक कुटुंब म्हणून आहोत, असे ते म्हणाले.
'जी२० परिषदेत तांत्रिक क्रांती व डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, महिला नेतृत्त्वाखालील विकास, हरित विकास, आरोग्य व शिक्षणावर भर या गोष्टींना प्राधान्य देण्यात येईल, असे कांत म्हणाले.
'२०४७पर्यंत आपण सर्वाधिक जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था असू शकतो. डेटा वापरण्यात आपण प्रथम क्रमांकावर असू शकतो. मोबाईल उत्पादनात आपण दुसर्या क्रमांकावर जाऊ शकतो, असा विश्वास कांत यांनी व्यक्त केला. कोरोना (Corona) डबघाईला आलेल्या लोकांचे उत्पन वाढवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
निर्भया फंडातून मंत्र्यांसाठी वाहन घेतल्याचा आरोप राज्य सराकारवर करण्यात आला आहे. यावर अमिताभ कांत म्हणाले, 'या घटनेवर भाष्य करण्याचा माझा अधिकार नाही. मी जी २० परिषदेवर बोलेन. निर्भया फंडाबाबत राज्य सरकार बोलेल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.