Thane News : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३० जूनपर्यंत मनाई आदेश; नागरिकांना 'हे' करता येणार नाही

Forbidden order In Thane Rural : शिंदे समर्थक विरुद्ध ठाकरे समर्थक असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकार्यालायने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मनाई आदेश काढले आहेत.
Forbidden order In Thane Rural
Forbidden order In Thane RuralSama Tv
Published On

मुंबई: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींनी सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड राजकीय तणाव आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट आणि मूळ शिवसेना असा वेगळा गट असे दोन गट सध्या शिवसेनेत तयार झाले आहे. मंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे (Thane) जिल्ह्याचे पालकमंत्री तर आहेच, शिवाय ठाणे जिल्ह्यात त्यांचे सर्वात जास्त समर्थक आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकनाथ शिंदेंचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे शिंदे समर्थक विरुद्ध ठाकरे समर्थक असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकार्यालायने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मनाई आदेश काढले आहेत. हे मनाई आदेश ३० जून २०२२ पर्यंत लागू असणार आहेत. (Thane District Latest News)

हे देखील वाचा -

Forbidden order In Thane Rural
लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा; दीपाली सय्यद यांचं ट्विट

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय परिस्थितीचा प्रभाव दिसू शकतो, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ३० जून २०२२ पर्यंत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश लागू राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यकक्षेतील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांनी दि. ३० जून २०२२ अनेक कृत्यांना मनाई आदेश लागू केले आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी याच्या आदेशानुसार ३० जून २०२२ पर्यंत या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदूका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्याला मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची, फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय व्यक्तिचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे, तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किवा लोकांत प्रचार करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

हे देखील पाहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com