भुकूमला बिल्डरने बांधलेली भिंत कोसळली, पुराचे पाणी सोसायटीत शिरले, अन्...

सोसायटीच्या बाजूला भिंत बांधून ओढ्याचे पाणी वळवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली होती, पण...
Flood water enters in society
Flood water enters in societysaam tv
Published On

भुकूम : बिल्डर लॉबी अनेक ठिकाणी मोठ मोठ्या इमारतींचे बांधकाम (building construction) करण्यासाठी रस्त्याच बांधकाम करतात. सोसायटीच्या बाजूला पाण्याचा नैसर्गिक प्रवाह जात असेल तर त्याठिकाणी पर्यायी जागेची व्यवस्था करतात. आंग्रेवाडीतही (Angrewadi) एका विकासकाने ओढ्याचे पाणी सोसायटीत जाऊ नये, यासाठी सोसायटीच्या बाजूला भिंत बांधून ओढ्याचे पाणी वळवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली होती. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे (Disaster Management) मोठ मोठ्या भिंती कोसळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यावेळी पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने ओढ्याला पूर आल्याने भिंत कोसळली. त्यानंतर पुराच्या पाण्याने सोसायटी जलमय झाली. परंतु, सुदैवाने कोणतीही (No casualties reported) जीवितहानी झाली नाही. इमारतीमध्ये अडकलेल्या चार जणांना परिसरातील ग्रामस्थांना सुखरुप बाहेर काढले आहे.

Flood water enters in society
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार स्वत: उतरणार मैदानात

मिळालेल्या माहितीनुसार, आंग्रेवाडी येथे विकासकाने इमारतीच्या बांधकामांसाठी जमिनी खरेदी केल्या. ओढ्याच्या जागेवर विक्री केलेल्या ठिकाणी ग्राहकांनी बंगल्यांचे बांधकाम केले. काल मंगळवारी या परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्याला मोठा पूर आल्याने सोसायटीजवळ बांधलेली भिंत कोसळली. त्यानंतर पुराचे पाणी सोसायटीत शिरले.

Flood water enters in society
सामन्यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार : एकनाथ शिंदे

या पाण्यात चार जण अडकले होते. कविता खाडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनस्थळी दाखल झाले आणि पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या घटनेची दखल ग्रामपंचायतीने घेतली असून उपसरपंच सचिन हगवणे,सचिन आंग्रे,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप चोरघे, संदीप भरतवंशी यांना विकासकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com