मावळ : 5 खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांवर रुग्णांची फसवणूक केल्याचा आरोप! (पहा Video)

महात्मा फुले योजनेत बसूनही उकळले रुग्णांकडून उकळले पैसे...
मावळ : 5 खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांवर रुग्णांची फसवणूक केल्याचा आरोप! (पहा Video)
मावळ : 5 खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांवर रुग्णांची फसवणूक केल्याचा आरोप! (पहा Video)दिलीप कांबळे
Published On

दिलीप कांबळे

मावळ, पुणे : मागील दोन वर्षांपासून सर्व रुग्णालये मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट करत आहेत हे सर्वश्रुत आहेच. कोरोना (Corona) रुणांची मोठ्या प्रमाणात लूट झाल्याचे देखील सर्वांना माहीत आहे. परंतु आता मावळ (Maval) तालुक्यात कोरोना रुग्णांची नव्हे तर अपघातग्रस्त आणि मेंदूच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप मावळ मधील जनविकास समितीने केला आहे.

पहा व्हिडीओ-

मावळ तालुक्यात गोरगरीब जनतेसाठी असणाऱ्या सरकारी योजनां लागू असणारी पाच रुग्णालये आहेत. मात्र या रुग्णालयांमध्ये कोणत्याच सरकारी योजनांचा फायदा गोरगरीब जनतेला दिला जात नसल्याचा आरोप जनविकास सेवा समितीच्या किशोर आवारे यांच्याकडून करण्यात आला आहे. मेंदूच्या विकाराने त्रस्त असलेला एक रुग्ण मावळ मधील अथर्व रुग्णालयात गेला असता त्याला महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बसत नसून पैशांची मागणी करून त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. तर दुसरीकडे अपघातग्रस्त असणाऱ्या रुग्णाला देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बसत नसल्याचे सांगत त्यांच्याकडून पैसे उकळले असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. त्यामुळे मावळ तालुक्यात रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. 

मावळ : 5 खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांवर रुग्णांची फसवणूक केल्याचा आरोप! (पहा Video)
आता ATM ने पैसे काढणं नवीन वर्षात महागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आम्ही गोरगरीब शेतकरी असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सर्व उपचार होत असताना देखील मावळ मधील अथर्व हॉस्पिटल मध्ये पैसे भरल्यावर उपचार केले गेले असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे हॉस्पिटल मध्ये पैसे भरले नाही म्हणून अपघातग्रस्त रुग्णावर उपचार केले गेले नाही, केवळ उपचार उशिरा झाल्यामुळे रुग्ण दगावला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असून मृताच्या लहान मुलांचा आधारवड हरपला असल्याची भावना देखील यावेळी नातेवाईकांनी व्यक्त केली. 

मावळ मधील महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू  असलेले अथर्व हॉस्पिटलवर जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेलं आरोप हे खोटे असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आम्हाला नको असल्याचे संमती पत्रक रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला दिले असल्याचा दावा देखील हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. आणि संबंधित रुग्ण हे पाच महिन्यानंतर आरोप करत असल्याने यात काही तथ्य नसल्याचे देखील हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हा यावर्षी तब्बल 161 रुग्णांना दिला असल्याचे हॉस्पिटल कडून सांगण्यात आले. केवळ राजकीय स्टंटसाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी हे आरोप केले असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. 

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com