Pimpri-Chinchwad Fire: फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत जखमींची प्रकृती गंभीर; डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

Pimpri-Chinchwad News: सर्व रुग्णांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांकडून शर्थाीचे प्रयत्न सुरू आहेत.
Sasoon Hospital
Sasoon HospitalSaam Tv
Published On

Pimpri-Chinchwad Fire:

पिंपरी चिंचवडमधील तळवडे एमआयडीसी येथील फटाक्यांच्या कारखान्यात काल भीषण आग लागली होती. या घटनेत जखमींच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आगीमध्ये जखमी झालेल्या १० रुग्णांवर उपचार सुरू असून अद्याप त्यांची प्रक्रृती गंभीर आहे, अशी माहिती समोर आलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sasoon Hospital
नाद करा पण पुणेकरांचा कुठं? भावानं चक्क घातलं बनीचं हेलमेट, Shining मारण्यात नेहमीचं पुढं; VIDEO VIRAL

ससून रुग्णालयातील (Sasoon Hospital) डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात काल सायंकाळी दाखल करण्यात आलेल्या १० जणांवर उपचार सुरू आहेत. भीषण आगीत (Fire) दहा जण जास्त प्रमाणात होरपळलेत. या सर्व रुग्णांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांकडून शर्थाीचे प्रयत्न सुरू आहेत.

रुग्णांची नावे

ससून रुग्णालयात प्रतिक्षा तोरणे (वय १६), शिल्पा राठोड (वय ३१), सुमन (४०), अपेक्षा तोरणे (वय २६), कविता राठोड (वय ४५), उषा पाडवे (४०) आणि प्रियंका यादव (३२), रेणुका ताथोड, (वय २०), शरद सुतार (वय ४५), कोमल चौरे (वय २५) असे १० रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना काल सायंकाळी तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस देखील केली. तसेच आवश्यक ते सर्व उपचार तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील फटाका गोदामाला काल सायंकाळी आग लागली होती. फटाक्यांमुळे आगीने जागीच रौद्ररुप धारण केलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत ७ कामगारांना आपला जीव गमवावा लागला.

Sasoon Hospital
Kalyan Crime News: कोयत्याचा धाक दाखवत पानटपरी चालकाला मारहाण करून लुटले, घटना CCTV त कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com