कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (kalyan dombivali municipal corporation) अंतर्गत असलेले कल्याण पश्चिमेतील बारावी येथे सुका कचरा वर्गीकरण करण्याचा प्रकल्प आहे. आज पहाटेच्या सुमारास या प्रकल्पात जमा केलेल्या कचऱ्याला अचानक आग (Fire) लागली. सुका कचरा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केलं त्यामुळे या प्रकल्पातील कचरा वर्गीकरण करणाऱ्या मशीनीलाही आगीची झळ बसली आहे. (Fire at KDMC's Barave waste project; Dry waste sorting machine also caught fire)
हे देखील पहा -
या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. अग्निशमन दलाने (Fire Brigade) घटनास्थळी धाव घेत तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला आग लागली होती, त्या पाठोपाठ आता बारावे येथील प्रकल्पातील कचऱ्याला आग लागल्याने केडीएमसीची (KDMC) डोकेदुखी वाढली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.