चेतन इंगळे
वसई-विरार : बनावट कॉल सेंटर च्या माध्यमातून, भारतातील वेगवेगळ्या मोबाईल धारकांना संपर्क साधून, शेअर मार्केटस, फॉरेक्स मार्केट मध्ये पैसे गुंतवायला सांगून, त्यात मोठा नफा झाल्याचे अमिश दाखवून, वेगवेगळ्या बँकेत पैसे भरायला सांगून लाखो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा वसईत भांडाफोड झाला आहे. Financial fraud of millions of investors by asking them to trade forex
या टोळीतील 6 जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 16 मोबाईल आणि 48 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 420, 406, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीना आज शुक्रवार ता 09 रोजी वसई न्यायालयात हजर केले असता 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
आदिल युसूफ मेमन (वय 28), हुसेन नेमान बुंदीवाला (वय 22), हुजेफा अकबर बहरेनवाला (वय 23), मूर्तजा हुजेमा भांडपुरावाला (वय 19), अब्देली शब्बीर ईजी (वय 21), हुसेन शब्बीर संजाणवाला (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वसई पश्चिम अंबाडी येथील विश्वकर्मा पॅराडाईज फेस 01, को. ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड A विंग, प्लॅट न 109 , या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर बनावट कॉल सेंटर च्या माध्यमातून मोबाईलवर संपर्क देश-विदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्या जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस उप निरीक्षक महेश गोसावी यांना मिळाली होती.
या बातमीची खातरजमा करून, सायबर गुन्हे शाखा पथकांना घेऊन छापा मारला असता 6 आरोपी रंगेहाथ पकडण्यात यश आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 16 मोबाईल, वेगवेगळ्या नंबरचे 48 सिमकार्ड, 10 वेगवेगळ्या बँकेचे खाते क्रमांक असलेली नोंद वही पोलिसांनी Police जप्त केली आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.