वरुणराजा आता तरी बरस रे; तिबार पेरणीमुळे शेतकरी दाम्‍पत्‍याची विष घेऊन आत्‍महत्‍या !

आर्थिक अडचण आणि दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीक उगवले नाही. तिबार पेरणीसाठी आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविले असल्याची घटना घडली आहे.
वरुणराजा आता तरी बरस रे; तिबार पेरणीमुळे शेतकरी दाम्‍पत्‍याची विष घेऊन आत्‍महत्‍या !
वरुणराजा आता तरी बरस रे; तिबार पेरणीमुळे शेतकरी दाम्‍पत्‍याची विष घेऊन आत्‍महत्‍या ! संजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा : आर्थिक अडचण आणि दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीक उगवले नाही. म्हणून तिबार पेरणीसाठी आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविले असल्याची घटना चिखली तालुक्यातील कारखेड येथे घडली आहे. या घटनेने मात्र संपुर्ण बुलडाणा Buldhana जिल्हा हादरला आहे. The financially strapped farmer couple ended their lives by taking poison

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या कारखेड येथील शेषराव मंजुळकार (वय ६०) आणि वर्षीय जनाबाई मंजुळकार (वय५१) अशी आत्‍महत्‍या केलेल्या शेतकरी दाम्‍पत्‍याची नावे आहेत.

शेतकरीं शेषराव मंजुळकार याची पत्‍नी जनाबाई यांचा गुरुवारी ८ जुलैच्‍या रात्री ९ वाजता तर शेतकरी शेषराव मंजुळकार यांचा शुक्रवारी ९ जुलैच्‍या सकाळी दोन वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्‍यू झाला आहे.

या शेतकरी दाम्पत्याने बुधवारी ७ जुलैला रात्री आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते. The financially strapped farmer couple ended their lives by taking poison

चिखली तालुक्याच्या कारखेड येथील मंजुळकार दाम्पत्यांकडे दोन एकर शेती असून यावर्षी पाऊस पडल्यावर त्यांनी पेरणी केली. मात्र पीक उगवले नाही, त्यामुळे त्यांनी शेतात दुसऱ्यांदा पेरणी केली, मात्र ते उगवलेले असतांनाही पावसाअभावी मात्र पीक करपून गेले.

वरुणराजा आता तरी बरस रे; तिबार पेरणीमुळे शेतकरी दाम्‍पत्‍याची विष घेऊन आत्‍महत्‍या !
पावसामुळे भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू; पाच जण जखमी

आता तिसऱ्यांदा पेरणी करायची तर त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. दोन्ही वेळा पेरणी केली तर जवळचे पैसे खर्च झाले आणि तिसऱ्यांदा पेरणी कशी करायची या विवंचनेत असल्याने दोघांनी बुधवारी ७ जुलै रोजी विष घेतले होते. त्यांना उपचारासाठी त्तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

तिथे दोघांचे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान गुरुवारी रात्री ९ वाजता जनाबाई यांचा मृत्यु झाला आहे. तर मध्यरात्रीनंतर शुक्रवारी सकाळी दोन वाजता शेषराव मंजुळकार यांचाही मृत्‍यू झाला. यां कुटुंबाकडे दोन एकर शेती असून, त्यांना दोन मुले तसेच चार मुली आहेत.

या सर्वांची लग्न झालेली आहेत. मंजुळकार दाम्पत्य हे त्यांच्या शेतीसोबतच परिसरात दगड फोडणे आणि मजुरी Wages करणे हा त्यांचा व्यवसाय होता. यावरच त्यांचा प्रपंच चालत असे. शिवाय पत्नी जनाबाई याना अर्धांगवायू आजार झालेला होता. या सर्व प्रकारामुळे दोघेही चिंताग्रस्त होते आणि याचा त्यांना ताण आला असावा आणि यामध्येच दोघांनी विष Poison घेतले असावे, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. मात्र या घटनेने संपूर्ण जिल्हा हदरला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com