राज्यपाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; शहापूरात प्रहारची मागणी

पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
Mumbai News
Mumbai Newsरामनाथ दवणे
Published On

मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज व माता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल (Governer) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांच्या नेतृत्वाखाली ४ फेब्रुवारी रोजी शहापूर पोलीस स्टेशनला एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

हे देखील पहा -

औरंगाबाद येथे एका साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थ के बिना शिवाजी को कोन पुछेगा असे वक्तव्ये केले हे वक्तव्ये छञपती महाराजांचा अवमान करणारे असुन देशातील तमाम शिवप्रेमीच्यां भावणा दुखवणारे आहेत.

Mumbai News
Buldhana: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड, एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहापूरात शिवरायांच्या पुतळ्या समोर राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत शहरात रँली काढण्यात आली. तसेच पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com