Navi Mumbai Police Station
Navi Mumbai Police StationSaam Tv

पोलीस हवालदाराविरोधात महिला पोलीस शिपाईने दाखल केला विनयभंगाचा गुन्हा

आरोपी हवालदाराचे नाव रामदास सोनावणे असून ते रबाळे वाहतूक पोलीस विभागात हवालदार म्हणून काम करतात तर फिर्यादी महिला या शिपाई पदावर कार्यरत आहे.
Published on

सिद्धेश म्हात्रे

मुंबई - नवी मुंबईतील रबाळे वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराच्या विरोधात त्याच ठिकाणी कार्यरत महिला पोलीस शिपाईने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हवालदारानेही मारहाण आणि मोबाईल चोरी प्रकरणी सदर महिला शिपायावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी हवालदाराचे नाव रामदास सोनावणे असून ते रबाळे वाहतूक पोलीस विभागात हवालदार म्हणून काम करतात तर फिर्यादी महिला या शिपाई पदावर कार्यरत आहे.

हे देखील पहा -

सोनावणे यांनी फिर्यादी यांच्या परिचित रिक्षा चालकाला मारहाण केली होती. ती सोडवण्यास गेलेल्या या महिला शिपायालाही त्यांनी अर्वाच्च शिवीगाळ करत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे सोनावणे यांच्या विरोधात सदर महिला शिपाई कर्मचाऱ्याने विनयभंगचा गुन्हा दाखल केला. तर सोनावणे यांनीही मारहाण आणि मोबाईल चोरी प्रकरणी त्या महिला शिपाई विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com