Ladki bahin yojana : तुमच्या बायका १५०० रुपयांत महिना काढणार का? लाडकी बहीण योजनेवरून शेतकरी महिलेचा सवाल

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेवरून शेतकरी महिलेने संतप्त सवाल केला आहे. तुमच्या बायका १५०० रुपयांत महिना काढणार का? असा सवाल शेतकरी महिलेने केला आहे.
तुमच्या बायका १५०० रुपयांत महिना काढणार का? लाडकी बहीण योजनेवरून शेतकरी महिलेचा सवाल
Ladki bahin yojana Saam tv

पुणे : राज्यभरात शेकडो महिला लाडकी बहीण योजनेसाठी शासकीय कार्यालयात गर्दी करू लागल्या आहेत. महिला वर्ग योजनेसाठी कागदपत्रे घेऊन शासकीय कार्यालयात पोहोचत आहेत. सरकारने या योजनेतील जाचक अटी देखील शिथील केल्या आहेत. एकीकडे या योजनेसाठी महिलांची झुंबड पाहायाला मिळत असताना दुसरीकडे एका शेतकरी महिलेने या योजनेवरून सरकारला संतप्त सवाल केला आहे. 'तुमच्या बायका १५०० रुपयांत महिना काढणार का? असा सवाल शेतकरी महिलेने लाडकी बहीण योजनेवरून केला आहे.

दूधाच्या दरावरून दूध उत्पदक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दूधाला किमान ४० रुपये हमीभाव मिळावा, यासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन देखील सुरु आहे. काही ठिकाणी दूधाच्या दरावरून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन देखील सुरु केलं आहे. याच प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.

तुमच्या बायका १५०० रुपयांत महिना काढणार का? लाडकी बहीण योजनेवरून शेतकरी महिलेचा सवाल
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे सादर करावा? वाचा सविस्तर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध परिषद आयोजित केली होती. या परिषदेच्या सभेत एका शेतकरी महिलेने राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. आम्हाला लाडकी बहिण योजनेची भीक नको, दूधाला भाव द्या... तुमच्या बायका १५०० रुपयांत महिना काढणार का, असा सवाल शेतकरी महिलेने केला आहे.

तुमच्या बायका १५०० रुपयांत महिना काढणार का? लाडकी बहीण योजनेवरून शेतकरी महिलेचा सवाल
Ladki Bahin Scheme News : लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची एकच गर्दी, वेबसाईट डाऊन असल्याने मनस्ताप

लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद

दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल सुरुच नसल्याचं समोर येत आहे. योजनेची घोषणा झाली तरी पोर्टल बंदच असल्याचे समोर येत आहे. तर १ तारखेला पोर्टल सुरु होणं अपेक्षित असताना पोर्टल अद्याप बंदच असल्याची माहिती मिळत आहे. तर सेतू कार्यालयात सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पंढरपुरात महिलांची गर्दी

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी झाली आहे. पंढरपूर शहरातील तलाठी कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तीन दिवसांपासून महिलांनी रांगा लावल्याच्या पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com