ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांचा निरोप समारंभ

ठाणे महानगर पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचा कार्यकाळ ६ मार्चपासून संपणार आहे.
ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांचा निरोप समारंभ
ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांचा निरोप समारंभSaamTvNews
Published On

ठाणे : ठाणे महानगर पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचा कार्यकाळ ६ मार्चपासून संपणार आहे. त्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेवर (Thane Muncipal Corporation) प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. आजचा दिवस हा ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवकांचा यंदाच्या कारकिर्दीतील  शेवटचा दिवस असल्याने सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी एकत्रित येऊन निरोप समारंभ (Farewell ceremony) सोहळा साजरा केला. या निरोप समारंभ सोहळ्या दरम्यान सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी एकत्रित पणे फोटो सेशन देखील केले. या फोटोसेशन वेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा देखील उपस्थित होते.

हे देखील पहा :

आजच्या या फोटोसेशन च्या सोहळ्यात महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या बरोबरच सर्वपक्षीय नगरसेवक देखील सहभागी झाले होते. आज पालिकेतील हिरवळीवर  भव्यदीव्य स्टेज देखील उभारण्यात आला होता. नगरसेवकांचा (Corporators) निरोप समारंभ सोहळा हा ठाणे (Thane) महानगर पालिकेत पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे. नगरसेवकांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षामध्ये नागरी समस्या, विकास कामे या मुद्यावरून नेहमीच वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांचा निरोप समारंभ
कांदा चिरताना आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून सातवीच्या विद्यार्थ्याने बनविला स्मार्ट चाकू!

विषय पाण्याचा असो वा विकास कामांचा असो, महासभेच्या वेळी सभागृहात या नगरसेवकांमध्ये नेहमीच खडाजंगी किंवा गदारोळ झालेला पाहायला मिळाला आहे. या पाच वर्षात विकासकामे आणि नागरीसुविधांच्या मुद्यावरून जरी मतभेद झालेले पाहायला मिळाले असले तरी ते मतभेद नसून वैचारिक भेद असल्याचे नगरसेवकांकडून यावेळी सांगण्यात आले. तर, भविष्यात पुन्हा एकदा नगरसेवक पद भूषवून महापालिकेच्या सभागृहात ठाणेकरांच्या सेवेसाठी पुन्हा लढा देणार असल्याचे देखील यावेळी नगरसेवकांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com