Fake currency racket: शेतामध्ये बनावट नोटांचा कारखाना, निवडणुकीत पैसे वापरल्याचा संशय; चौघांना अटक, म्होरक्या फरार

Palghar crime news: पालघरच्या निहालापाडा येथील शेतीच्या आवारामध्ये मागील ७ महिन्यांपासून बनावट नोटांचा कारखाना सुरू होता. शेतात पत्र्याचे शेड उभारून बनावट नोटा तयार करण्यात येत होते.
Palghar Crime
Palghar CrimeSaam Tv News
Published On

पालघरच्या निहालापाडा येथील शेतीच्या आवारामध्ये मागील ७ महिन्यांपासून बनावट नोटांचा कारखाना सुरू होता. शेतात पत्र्याचे शेड उभारून बनावट नोटा तयार करण्यात येत होते. मात्र, रविवारी भायखळा पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. निवडणूक काळात मुंबईत या बनावट नोटांचा मोठ्या प्रमाणात वितरण केल्याचा संशय आहे. नंतर कारवाई करत पोलिसांनी ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण टोळीचा मास्टरमाईंड अद्यापही फरार आहे.

उमरान उर्फ आसिफ बलवले, यासीन युनूस शेख, भीम बडेला आणि नीरज वेखंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, टोळीचा मास्टरमाईंड फरार असल्याची माहिती आहे. ही टोळी ३५-४० रूपये दिल्यावर १ लाखांच्या बनावट नोटा तयार करून द्यायचे. कुणाला संशय येऊ नये म्हणून दुचाकीच्या डिकीतून पालघर येथून बनावट नोटा घेऊन येत असायचे. या टोळीने निवडणूक काळात काही नोटा मुंबईत दिल्याची माहिती तपासात समोर आलीय. तसेच यातील काही बनावट नोटा चलनात देखील आल्याचे तपासात समोर आलंय.

Palghar Crime
ST Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात भीषण अपघात, झाडामुळे एसटी बस धरणात पडता पडता वाचली; ७ प्रवासी जखमी

या टोळीने मोटारसायकलवरून मुंबईत नोटा आणल्या होत्या. भायखळा येथे काही नोटा वितरीत करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. वरिष्ठ चिमाजी आढाव यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत उमरानला ताब्यात घेतलं. नंतर यासिन आणि भीमला अटक केली. त्यांच्या चौकशीत नीरजची माहिती मिळाली. पोलिसांनी नंतर थेट पालघरचे निहालरपाडा गाठत नीरजला ताब्यात घेत, चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, मास्टरमाईंड अद्यापही फरार आहे.

Palghar Crime
Amravati News: कुणाला उलट्या तर कुणाला पोटदुखी; अमरावतीतील MIDCत १०० कामगारांना अचानक विषबाधा

मास्टरमाईंड आरोपी फरार

फरार असलेला आरोपी एका गुन्ह्यात जामिनावर सुटला होता. नीरजच्या मदतीने त्याने बनावट नोटा बनवण्याचे ठरवले. त्यासाठी त्यानं पालघरच्या निहालपाडा येथील शेतीतील जागा निवडली, आणि तिथेच पत्र्याचे शेड टाकून बनावट नोटा तयार करण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडे बनावट नोटा ओळखण्याचे देखील मशीन होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपींना अटक केली असून, मास्टरमाईंड आरोपीच्या शोधात पोलीस आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com