मावळमध्ये लष्कराच्या गाड्यांचे 15 डिसेंबर पासून प्रदर्शन

सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील खुले राहणार प्रदर्शन
मावळमध्ये लष्कराच्या गाड्यांचे 15 डिसेंबर पासून प्रदर्शन
मावळमध्ये लष्कराच्या गाड्यांचे 15 डिसेंबर पासून प्रदर्शनदिलीप कांबळे

मावळ : मावळमधील देहूरोड मध्ये लष्कराच्या गुणवत्ता आश्वासन नियंत्रण (CQA-SV) मध्ये लष्कराच्या (army) विशेष वाहनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १५ डिसेंबरला सकाळी १० वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने लष्करात वापरात असलेल्या तसेच वापरून जुन्या झालेल्या गाड्या, रणगाडे, ट्रक हे सर्वसामान्य नागरिकांना बघायला मिळणार आहेत.

हे देखील पहा-

१५ डिसेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत लष्कराचे हे प्रदर्शन सर्व सामान्य नागरिकांसाठी खुले राहणार आहे. हे लष्कराचे प्रदर्शन खास भारतीय (Indian) बनावटीच्या शस्त्रास्त्र बनविण्यासाठी खाजगी कंपन्यांना "आत्मनिर्भर भारत" आणि "मेक इन इंडिया" (Make in India) च्या योजने अंतर्गत प्रोत्साहन मिळावे. यासाठी प्रामुख्याने भरविण्यात येणार आहे. (Exhibition of Army vehicles in Maval from 15th December)

मावळमध्ये लष्कराच्या गाड्यांचे 15 डिसेंबर पासून प्रदर्शन
राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं- नितेश राणे

त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांना लष्करात कोणत्या प्रकारच्या गाड्या वापरल्या जातात याची माहिती मिळावी. यासाठी देखील हे प्रदर्शन सर्व सामान्य लोकांसाठी खुले ठेवण्यात आले असल्याची माहिती ब्रिगेडियर आर.धनखड यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com