राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं- नितेश राणे

आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली
राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं- नितेश राणे
राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं- नितेश राणेSaam TV
Published On

सिंधुदुर्ग : आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली आहे. राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं असं माझं मत आहे. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना आपले गुरू मानू नये आणि बोलू नये. हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम रहावं आणि पोलिसांचा गरड बाजूला करा मग जीभ कशी वापरायची हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दाखवेल असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लगावला आहे.

शिवसेनेच्या युवा नेत्यांनी दिशा सालीयनचा मर्डर करावा, तिच्यावर अत्याचार करून तिला इमारतीवरून फेकलेल चालतं. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला जबाबदार असलेलं चालते. आशिष शेलारांनी जे कधी म्हंटलच नाही ते या लोकांना चालत नाही. महिलांवरील अत्याचाराबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार राहिला आहे का? यांच्या राज्यात महिला सर्वात असुरक्षित, कायदा आणि सुव्यवस्था यांचे धिंडवडे निघाले आहेत.

हे देखील पहा-

शिवसेनेच्या महिलांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या या नेत्यांवर आक्षेप घ्यावा.घाणेरडं राजकारण करून जे बोललं नाही त्या वक्तव्यावर कशाला बोंबाबोंब करत आहात इंपेरिकल डाटा हा राज्य सरकारने तयार करायचा आहे. त्यासाठी 200 ते 300 कोटी हे राज्यसरकारने आपल्या अर्थखात्यातून द्यायचे आहेत. हे पैसे राज्य सरकारने (State Government) का दिले नाहीत हे ओबीसींचे नेते छगन भुजबळ आणि विजय वडडेट्टीवार यांनी सांगावं. तो डाटा तयार न केल्यामुळे ओबीसी समाजाच्या उमेदवारांवर मोठा अन्याय झाला आहे. मग नेमके जबाबदार कोण आहे? (sanjay raut nitesh rane tongue needs to be researched)

राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं- नितेश राणे
मेक्सिको अपघातः स्थलांतरित लोकांना नेणारा ट्रक कोसळला, 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी

छगन भुजबळ साहेबांना अजित दादांवर बोट उचलण्याची हिंमत आहे का? मराठा समाज,ओबीसी समाजचे अस्तित्व मिटविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे का? छगन भुजबळ यांनी दिल्लीत बसण्यापेक्षा अजित दादांच्या घरी जाऊन बसले असते आणि त्यांच्याकडून 30 कोटी आणले असते तर आज ओबीसी समाजाच भले झाले असते. याच उत्तर छगन भुजबळ यांनी द्यावे. मी जर खोटं बोलत असेल तर ते जिथे सांगतील तिथे यायला तयार आहे आणि येऊन त्यांची माफी मागायला तयार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com