अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यात तब्बल ५० लाखांची गोव्याची दारू जप्त करण्यात आलीये. कुंभार्ली गावाच्या हद्दीतील एका गोदामात धाड टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाने ही कारवाई केली. (Excise department seizes Goa liquor worth Rs 50 lakh in Ambernath taluka)
हे देखील पहा -
अंबरनाथ तालुक्यातील कुंभार्ली गावाच्या हद्दीत एका गोदामात गोव्यात तयार झालेली आणि गोव्यातच विक्रीला परवानगी असलेली दारू आणून ती राज्यातील दारूच्या बाटल्यांमध्ये भरली जात होती. याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाला मिळाल्यानंतर या गोदामावर धाड टाकण्यात आली. याठिकाणी 550 गोवा बनावटीच्या दारूच्या बॉटलसह दोन कार, एक दुचाकी, तसंच मोबाईल आणि रोकड असा तब्बल ४९ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी वासुदेव चौधरी, रंजन शेट्टी आणि गुलाब राजा या तिघांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.