SSC-HSC Exam: ग्रामीण आणि डोंगराळ भागात परिक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीला जोर

विद्यार्थांना अपयश आले तर विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो.
SSC-HSC Exam: ग्रामीण आणि डोंगराळ भागात परिक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीला जोर
SSC-HSC Exam: ग्रामीण आणि डोंगराळ भागात परिक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीला जोरSaam TV
Published On

पुणे: कोरोना महामारीच्या संकट काळात शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याची तीव्र भावना विद्यार्थी वर्गातुन व्यक्त होत असुन ऑनलाईन शिक्षणातुन संपुर्ण अभ्यासक्रम पुर्ण न झाल्याने 10 वी आणि 12 वी च्या बोर्ड परिक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थींनी केली आहे. पुण्याच्या ग्रामीण डोंगराळ भागातील विद्यार्थींनींना नेटवर्क अभावी ऑनलाईन शिक्षणही प्रभावीपणे मिळाले नाही त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी भाजपाचे नेते अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली खेड तहसिलदार कार्यालयात विद्यार्थीनी निवेदन देऊन केली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थीत होत्या.

10 वी आणि 12 वी या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थांच्या पुढील शिक्षणाचा पाया आहे त्यामुळे या परिक्षांमध्ये विद्यार्थांना अपयश आले तर विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो त्यामुळे विद्यार्थांना मिळालेल्या अपुऱ्या शिक्षणामुळे अपयशाचा सामना करावा लागू नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेण्यात यावी अन्यथा पुढील काळातील विद्यार्थी आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार असेल असेही यावेळी भाजपाचे नेते अतुल देशमुख यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com