'या' तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यावी अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
'या' तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता
'या' तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यताSaam TV
Published On

मुंबई : अनेक दिवसांपासून रखडलेली आणि राज्याच्या राजकारणातला एक वादासह चर्चेचा विषय ठरलेली महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) ९ मार्चला घ्यावी अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक ९ मार्चलाच होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

'या' तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता
Election Update : पाहा निवडणुकीच्या बातम्यांचा वेगवान आढावा

मागील अधिवेशनात होवू न शकलेली अन राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या वादाचा विषय ही विधानसभाध्यक्षाची निवडणूक, अर्थसंकल्पापूर्वी घ्या असे पत्र पाठवण्यात येणार असून त्यानुसार कार्यक्रम ठरवला जाईल असा विश्वास महाआघाडी सरकारमधील नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान १० मार्च पूर्वी मंत्रिमंडळात बदल होतील असे संकेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील कालच दिले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आघाडी सरकार सकारात्म असल्याचं दिसत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com