एकनाथ शिंदे गट-शिवसेनेत 'ऑनलाइन' जुंपली; नीलम गोऱ्हेंना व्हॉट्सअॅप ग्रुपमधून केले रीमूव्ह

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.
Neelam Gorhe removed from Yuva sena Shivsena Whatsapp Group
Neelam Gorhe removed from Yuva sena Shivsena Whatsapp Group SAAM TV
Published On

सचिन जाधव

Eknath Shinde - Shivsena पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात जोरदार जुंपली आहे. एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले उदय सामंत यांच्या वाहनावर पुण्यात हल्ला झाल्याच्या घटनेनंतर त्यांच्यातील संघर्ष आता आणखी चिघळल्याचे चित्र आहे. हा संघर्ष आता थेट व्हॉट्सअॅपवरही सुरू झाला आहे.

पुण्यातील युवा सेनेचे पदाधिकारी आणि शिंदे यांच्या गटातील किरण साळी यांनी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमधून रीमूव्ह केले आहे.

Neelam Gorhe removed from Yuva sena Shivsena Whatsapp Group
'या गद्दारांना लोक...'; उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील नेते, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि त्यांना समर्थन देणाऱ्या नेत्यांकडून राज्यात विविध ठिकाणी सभा घेण्यात येत आहेत.

पुण्यात काल, मंगळवारी शिंदे यांना पाठिंबा देत गटात सहभागी झालेले उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर हल्ला झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापलं होतं. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर आरोप करण्यात येत आहे. आता हाच वाद सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.

Neelam Gorhe removed from Yuva sena Shivsena Whatsapp Group
Pune : उद्धव ठाकरे यांना एकटं पडू देणार का ? आदित्य ठाकरेंची शिवसैनिकांना भावनिक साद

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नियुक्त केलेले युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमधून रीमूव्ह केले आहे. त्यामुळे हा संघर्ष आता थेट व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही पोहोचला आहे.

किरण साळी यांनी २०१८ मध्ये शिवसेना-युवासेना पत्रकार मित्र असा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये अनेक पत्रकारांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते मंडळीही आहे. साळी यांनी काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला होता. या ग्रुपमध्ये नीलम गोऱ्हे या देखील सक्रिय होत्या. त्यांनी आपली राजकीय भूमिकाही मांडली होती.

उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. किरळ साळी यांनी या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून नीलम गोऱ्हे यांनाही रीमूव्ह केले आहे. साळी हे उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत. सामंत यांच्या वाहनावर पुण्यात हल्ला झाल्यानंतर आता या दोन्ही गटांतील वाद व्हॉट्सअॅपवर ग्रुपवरही पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com