बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

महापालिका निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे... त्यामुळे राज्यात शिंदेसेनेच्या पिछेहाट होण्याला कोणते मंत्री कारणीभूत आहेत? या अकार्यक्षम मंत्र्यांबाबत शिंदे नेमकी काय भूमिका घेणार आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
eknath shinde
eknath shinde.x
Published On

राज्यातील 29 महापालिकांच्या निकालानंतर आता एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असल्याची चर्चा सुरु झालीय... राज्यातील 29 पैकी 25 पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजपनं वर्चस्व प्रस्थापित केलयं... तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवली वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिंदेसेनेला चांगलाच फटका बसलाय... या वर्चस्वाच्या लढाईत शिंदेसेना चांगलीच अस्वस्थ झालीय...

एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?

- 29 जिल्ह्यातील मनपा निकालावर शिंदे नाराज?

- सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती?

- जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा

अकार्यक्षम मंत्र्यांवर केवळ पक्षाचीच जबाबदारी

दरम्यान कुठल्या मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे पाहूयात...

eknath shinde
महापौरपदावरून मोठा ट्विस्ट, एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार

गृहराज्यमंत्री योगेश कदम जबाबदारी असणाऱ्या मुंबई महापालिकेत 227 पैकी शिंदेसेनेला अवघ्या 29 जागा मिळाल्यात... मंत्री प्रताप सरनाईकांच्या मीरा-भाईंदर महापालिकेत 95 पैकी फक्त फक्त 3 जागांवर शिंदेसेनेला समाधान मानावे लागले.. तर मंत्री दादा भुसेंकडे नाशिकची जबाबदारी असूनही 122 पैकी शिंदेसेना फक्त 26 जागांवर निवडून आलीय... दुसरीकडे मंत्री संजय शिरसाटांच्या संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेला 115 पैकी फक्त 13 जागांवर समाधान मानावं लागलंय...

eknath shinde
दुकानाबाहेर भंगार ठेवल्याने वाद पेटला; व्यावसायिकासह वडिलांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

एवढंच नाही तर या महापालिकांमध्ये अपेक्षित यश गाठू न शकलेल्या जिल्ह्यातील अकार्यक्षम मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवून शिंदे नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार असल्याचं बोललं जातयं... आता जरी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असला तरी भविष्यातील पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मंत्रीमंडळातून कोणाला डच्चू मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com