eknath shinde latest news
eknath shinde latest news Saam Tv

फडणवीस यांना वगळून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शाह आणि शिंदे यांच्यात चर्चा?

सुमारे महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन केले. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता टीका सुरू केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत ५ वेळी दिल्ली दौरा केलेला आहे, यावरुन टीका सुरू आहेत. या पार्श्वभूमिवर आता एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माध्यमांना गुंगारा देत दिल्ली गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बुधवारी दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात तासभर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारा संबंधित चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

eknath shinde latest news
शिंदे गटातील आमदारांचे मंत्रीपदासाठी लॉबिंग? अब्दुल सत्तार थेट दिल्लीत दाखल

मंत्रिमंडळ विस्तार आणि १ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. १८ मंत्रिपद शिंदे गटाला देण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. तसेच कोर्टाच्या निकालानंतर लगेच मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल असे देखील एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना सांगितल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

eknath shinde latest news
Email मध्ये फेरफार करत कंपनीची तब्बल एक कोटीची फसवणूक; आरोपींनी पैशातून खरेदी केलं सोनं

शिंदे गटातील आमदारांचे मंत्रीपदासाठी लॉबिंग?

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आता जुलै महिना संपला तरीही अजूनही झालेला नाही त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. मात्र सुमारे महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला असतानाही शिंदे गटात मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. अशा स्थितीत आता मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे. (Eknath Shinde Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com