Email मध्ये फेरफार करत कंपनीची तब्बल एक कोटीची फसवणूक; आरोपींनी पैशातून खरेदी केलं सोनं

आरोपींनी पाटील यांच्या अधिकृत ई-मेल आयडीमध्ये किरकोळ बदल करून नवा ई-मेल आयडी तयार केला होता.
Email मध्ये फेरफार करत कंपनीची तब्बल एक कोटीची फसवणूक; आरोपींनी पैशातून खरेदी केलं सोनं

मुंबई : कर्नाक बंदर येथील कंपनीची एक कोटी रुपयांची सायबर फसवणूक (Cyber ​​Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ‘मॅन-इन-मिडल’ (MIM) सायबर हल्ला करून आरोपींनी या कंपनीची फसवणूक केली असून या टोळीतील आणखी काही सदस्यांचा शोध पोलीस (Police) घेत आहेत.

भुमेश्वर शर्मा (५२), हेमंत सोलिया (४३) आणि अभय पटीवार (४३) अशी अटक करण्यात आलेल्या तिघां आरोपींची नावे आहेत. तिघेही मुंबईतील रहिवासी आहेत. बॉम्बे मरिन एंटरप्रायझेस या तक्रारदार कंपनीचा भंगार खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच बॉम्बे मरिन एंटरप्रायझेस विविध कंपन्यांना क्रेन सेवाही पुरवते.

Email मध्ये फेरफार करत कंपनीची तब्बल एक कोटीची फसवणूक; आरोपींनी पैशातून खरेदी केलं सोनं
MiG-21 crash: हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानच्या बारमेरमध्ये कोसळले, दोन पायलट ठार

कर्नाक बंदर मशीद (पूर्व) येथे या कंपनीचे कार्यालय आहे. तक्रारदार कंपनी लार्सन ॲण्ड टुब्रो (एल ॲण्ड टी) कंपनी, पवई सोबत गेल्या २२ वर्षांपासून व्यवसाय करीत असून तक्रारदार कंपनी त्यांच्याकडून भंगार साहित्य खरेदी करीत आहे. एल ॲण्ड टी (L&T) कडून प्रकल्प व्यवस्थापक मंगेश पाटील सर्व व्यावसायिक सौद्यांसाठी तक्रारदार कंपनीशी समन्वय साधत होते. तक्रारदार कंपनीशी संपर्क साधण्यासाठी ते कंपनीच्या ई-मेल आयडीचा (Email ID) वापर करीत होते.

२० मे ते १५ जुलैदरम्यान, तक्रारदार कंपनीला मंगेश पाटील नावाच्या व्यक्तीच्या ई-मेल आयडीवरून मेल प्राप्त झाला. त्यात त्यांनी व्यवहाराची रक्कम दुसऱ्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. तक्रारदार कंपनीने ई-मेलमध्ये दिलेल्या बँक खात्यात एक कोटी रुपये जमा केले. पण एल ॲण्ड टी कंपनीला ही रक्कम मिळालीच नाही. तसेच मंगेश पाटील यांनी तक्रारदार कंपनीला कोणताही ई-मेल पाठवला नसल्याचे संबंधितांच्या लक्षात आले.

आरोपींनी पाटील यांच्या अधिकृत ई-मेल आयडीमध्ये किरकोळ बदल करून नवा ई-मेल आयडी तयार केला होता. बनावट ई-मेल आयडीच्या मार्फत तक्रारदारांशी संपर्क साधण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. अखेर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Crime) गुन्हा दाखल केला.

पाहा व्हिडीओ -

तसंच आरोपींनी या पैशातून सोने खरेदी केल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्या चौकशीतून पोलिसांनी सात लाख २६ हजार रुपये किंमतीची तीन सोन्याची नाणी आणि चार सोन्याच्या छोट्या लगड असे एकूण १३१.३७ ग्रॅम सोने जप्त केले.

आरोपींच्या बँक खात्यातील ३९ लाख ६४ हजार रुपये गोठवण्यातही पोलिसांना यश आले. काही संशयितांचीही पोलिसांनी ओळख पटवली असून या प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले आहेच. येत्या काही दिवसांत याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

लोन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज देऊन धमकावणाऱ्या टोळक्यांविरोधात सायबर पोलिसांनी विशेष मोहिम सुरू केली होती. ही टोळी अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज देऊन आरोपी मोबाइलचा गोपनीय डेटा मिळवायचे. त्याच्या माध्यमातून पुढे कर्ज घेणाऱ्याला धकावले जायचे. त्याप्रकरणी आतापर्यंत सायबर पोलिसांनी १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणामागे एका चीनी कंपनीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींनी आतापर्यंत सुमारे ३५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून गैरव्यवहारातील रक्कम परदेशात पाठवत होते. अटक आरोपींमध्ये विविध कंपन्यांच्या पाच संचालकांचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com