Dombivali: "मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात"; डोंबिवलीतील दहिहंडीत CM एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

Eknath Shinde In Dombivali Dahihandi : मुख्यमंत्री शिंदे हे काल, शुक्रवारी रात्री पिंपळास ते मोठागाव असा बोटीने प्रवास करुन आणि डोंबिवलीची खाडी पार करुन दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या दहिहंडीला आले होते.
Eknath Shinde In Dombivali Dahihandi
Eknath Shinde In Dombivali Dahihandiप्रदीप भणगे

डोंबिवली: शिंदे समर्थक आणि केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रात्री साडे अकराच्या सुमारास हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना आपल्या खास शैलीने कार्यकर्त्यांची मनं जिंकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपण या सरकारची स्थापना केली. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं अशा सगळ्यांचं हे सरकार आहे, "मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात" असं वक्तव्य केलं करत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांची मनं जिंकली. मुख्यमंत्री शिंदे हे काल, शुक्रवारी रात्री पिंपळास ते मोठागाव असा बोटीने प्रवास करुन आणि डोंबिवलीची (Dombivali) खाडी पार करुन दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या दहिहंडीला आले होते. यावेळी माजी महापौर पुडलीक म्हात्रे आणि शहरप्रमुख राजेश मोरे हेदेखील उपस्थित होते. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री डोंबिवली पश्चिमेतील दहिहंडीला हजेरी लावत कार्यकर्त्यांची आणि उपस्थित नागरिकांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी भिवंडी येथील पिंपळास ते डोंबिवली पश्चिम येथील मोठा येथे खाडी प्रवास केला आणि सम्राट चौकातील हंडीला हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की सरकार तुमच्या सगळ्यांच सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे, शिवसेना भाजपा-युतीचं सरकार आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे, म्हणून प्रत्येकाला वाटते हे माझं सरकार आहे, आपलं सरकार आहे. हीच बाब गोविंदा उत्सवांमध्ये पाहायला मिळत असून अनुभवला मिळत आहे, ही चांगली बाब आहे.

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपण या सरकारची स्थापना केली. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, सगळ्यांचंच सरकार आहे. मी एकटा मुख्यमंत्री नाही तर, तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात. आपण या गोविंदामध्ये निर्णय घेतला असून दहा लाखांच्या विम्याची घोषणा सरकारने केली. त्याचबरोबर पुढच्या वर्षापासून प्रो कबड्डी प्रमाणे प्रो गोविंदा सुरू होणार, यावर्षी आपण सार्वजनिक सुट्टी पण जाहीर केली होती. कुठलाही गोविंदाला इजा झाली, दुखापत झाली, अपघात झाला तर त्याचा संपूर्ण खर्च सरकार विनामूल्य ट्रीटमेंट करणारा निर्णय घेतला आहे. तसेच शिंदे यांनी बोटीच्या प्रवासा बद्दल सांगितले की, बोट चांगली होती सुरक्षितपणे आलेलो आहे. या ठिकाणी पोहोचलोय, खरं म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह होता, आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावच लागतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde In Dombivali Dahihandi
देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार का ? अमृता फडवणवीस म्हणाल्या...

यावेळी माजी नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी भावुक होऊन सांगितले की, सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री कसा असावा, हे आज मुख्यमंत्री साहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कार्यकर्त्यांची मनं जपण्यासाठी मुख्यमंत्री कुठल्याही थराला जाऊ शकतात. कार्यकर्त्यांचं आणि गोविंदा पथकांच मन जपण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज डोंबिवलीत हजेरी लावली. खूप कष्ट करणारे सर्व सामन्यांचे ते मुख्यमंत्री आहेत आणि डोंबिवली मध्ये हजेरी लावून त्यांनी हे सिद्ध केलं अशा भावना दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com