देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार का ? अमृता फडवणवीस म्हणाल्या...

ब्राह्मण संघाच्या मागणीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis saam tv
Published On

सचिन जाधव

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवलं आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पत्र पाठवत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. ब्राह्मण संघाच्या मागणीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Amruta Fadnavis News In Marathi)

Amruta Fadnavis
Dahi Handi 2022 : एकीकडे उत्साह दुसरीकडे गालबोट; मुंबईत आतापर्यंत १११ गोविंदा जखमी

देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. २०२४ ची लोकसभा निवडणुकी आधीच अनेकांनी अंदाज लावण्यास सुरूवात केली आहे. त्यात अमृता फडणवीस या पुण्यात बावधन येथे दहीहंडी उत्सवानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुणे लोकसभा उमेदवारीवरून भाष्य केलं.

अमृता फडवणवीस म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी, कर्मभूमी, बालेकिल्ला नागपूर आहे. पण असं असलं तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात. मला महाराष्ट्र आवडतो. मला इथेच राहायचं आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच बघायला आवडेल'.

Amruta Fadnavis
उठल्याबसल्या राजकारण हा बालिशपणा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपला टोला

शिंदे सरकारने गोविंदांना दिलेल्या आरक्षणावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, 'दहीहंडी हा खेळ कृष्ण भगवान यांच्यापासून सुरू झाला आहे. त्याला पाठिंबा मिळणार आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे. याला आरक्षण दिलं आहे. तर फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाले तर, यावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, 'पुणे माझं आजोळ आहे. मला जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी पुण्यात येते. ते नागपूरचे आणि पुण्याचे दोन्ही ठिकाणचे पालकमंत्री झालेले आवडेल'.

'सगळ्यांना माहित आहे की, सरकार कसं आलं आहे. त्यांचा आधार काय आहे, जे बोलतात त्यांची विश्वासार्हता काय आहे ? असा सवाल करत त्यांनी सरकारला गद्दार म्हणणाऱ्या विरोधकांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com