Maharashtra Politics : विधानसभेसाठी शिंदे गटाकडून तयारी सुरु; पक्षातील आमदारांचा मित्रपक्षांबाबत वेगळाच सूर, नेमकं काय राजकारण शिजतंय?

Eknath shinde Group News : विधानसभेसाठी शिंदे गटाकडून तयारी सुरु झाली आहे. पक्षातील आमदारांचा मित्रपक्षांबाबत वेगळाच सूर पाहायला मिळत आहे. त्यामळे महायुतीत नेमकं काय राजकारण शिजतंय, हे पाहावे लागेल.
Mahayuti Seat Sharing
mahayuti Saam Tv
Published On

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे दिसत आहे. सर्व राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. शिंदे गटानेही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने २ सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात शिंदे गटाला १३४ जागा अनुकूल असल्याचा दावा करण्यात आला आहे. विधानसभेच्या उमेदवारीबाबत मित्रपक्षांनी हस्तक्षेप करू नये, असाही सूर शिंदे गटात असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने सर्वेक्षण चाचपणी केली आहे. या सर्वेक्षणात शिंदे गट पहिल्या क्रमाकांवर असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाने विधानसभेसाठी आतापर्यंत २ सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात १३४ जागांवर पक्षाची परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mahayuti Seat Sharing
Political News : उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय; बावनकुळे कडाडले

सर्वेक्षणांच्या आधारावरच शिंदे गट राज्यात विधानसभेसाठी महायुतीकडे जागा मागण्याची शक्यता आहे. महायुतीसोबत असलेल्या मित्रपक्ष लक्षात घेता जागा वाटपात जरी तडजोड करण्यात आली, तरी उमेदवार निश्चितीबाबत पक्षनेत्यांनीच निर्णय घ्यावा, अशी आमदारांची मागणी आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वेक्षणावरून शिंदे गटाने ४ ते ५ जागांवरील तत्कालीन खासदारांचे तिकिट कापण्यात आले होते. याचा परिणाम शिंदे गटाच्या त्या जागांवरही दिसून आला. विधानसभेला मात्र असा प्रकार होऊ नये, याची खबरदारी शिंदे गटाकडून घेतली जात आहे.

Mahayuti Seat Sharing
Maharashtra Politics: जागा वाटपावरुन महायुतीत कलह, आघाडीतही बिघाडी? ठाकरे गटाच्या दाव्याला शरद पवार गट, काँग्रेसचे आव्हान; वाचा सविस्तर...

विधानसभेच्या उमेदवारीबाबत मित्रपक्षांनी हस्तक्षेप करू नये. ज्या त्या पक्षांतील प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षातील उमेदवार निश्चित करावे, असा सूर शिंदे आमदारांमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाच्या आमदारांचा मित्रपक्षांनी हस्तक्षेप करू नये, असा सूर उमटल्यानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com