ठाकरेंचे निष्ठावंत शिंदेंच्या गळाला? नाराज सकपाळांची शिंदेंकडून भेट

Municipal Elections: महापालिका निवडणुकीत फोडाफोडीला जोर आलाय.. त्यातच शिंदेंनी आधी नाराज अनिल कोकीळांना पक्षात घेतलं... त्यानंतर आता थेट मातोश्रीच्या निष्ठावंताला गळाला लावलंय... त्यामुळे ठाकरेंची बालेकिल्ल्यातच कोंडी झालीय... ती नेमकी कशी.. आणि शिंदेंनी नेमकं कुणाला गळाला लावलंय..
Dagdu Sakpal meets Eknath Shinde amid anger over Thackeray ticket allocation in Lalbaug-Parle
Dagdu Sakpal meets Eknath Shinde amid anger over Thackeray ticket allocation in Lalbaug-ParleSaam Tv
Published On

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत..त्यातच आता शिंदेंनी ठाकरेसेनेच्या बालेकिल्ल्यालाच हात घातलाय... ही दृश्य पाहा... दगडू सकपाळांच्या नाराजीच्या पार्श्वभुमीवर.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट त्यांची भेट घेत राजकीय डाव टाकला. साहजिकच याभेटीनंतर सकपाळांच्या शिंदेसेनेच्या प्रवेशाच्या बातम्यांची चर्चा सुरू झाली..

सकपाळ यांना ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखलं जातं.. तर लालबाग परळमध्ये दगडू सकपाळांचं मोठा प्रभाव आहे... असं असतानाही दगडू सकपाळांनी मुलगी रेश्मा सकपाळ यांच्यासाठी प्रभाग 203 मधून उमेदवारी मागितली होती...मात्र ठाकरेंनी भारती पेडणेकरांना उमेदवारी दिली.. त्यामुळं सकपाळांनी नाराज असल्याची कबुलीच दिलीय.. तर राऊतांनी सकपाळांची नाराजी दूर करण्याचं आश्वासन दिलंय...

दगडू सकपाळ हे 1999 ते 2009 पर्यंत परळचे आमदार होते... मात्र परळचं विभाजन होऊन शिवडी मतदारसंघ तयार झाला.... त्यानंतर शिवडीतून त्यांचा पराभव झाला.. मात्र लालबाग आणि परळमध्ये सकपाळांचं वर्चस्व कायम आहे.. आता ठाकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबाग परळमध्ये मातोश्रीचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या अनिल कोकीळ यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकानंतर आता सकपाळांना शिंदेंनी गळाला लावल्यास त्याचा लालबाग परळ या बालेकिल्ल्यात ठाकरेसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे... त्यामुळे ठाकरे हे दगडू सकपाळांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार की सकपाळ महापालिका निवडणुकीत शिंदेंना बळ देणार? यावर लालबाग परळमधील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com