

निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली
नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप स्वबळावर
शिंदेंनी ठाकरे गटाचे पदाधिकारी फोडले
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना आणि भाजपने युती केली आहे. तर नवी मुंबईत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासमोर थेट भाजपचं तगडं आव्हान असणार आहे. नवी मुंबईत राजकीय वातावरण तापलं असतानाच शिंदेंनी मोठा डाव टाकला आहे. शिंदेंनी नेरुळमधील ठाकरे गट, मनसे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे.
नवी मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरुळ विभागातील ठाकरे गट, मनसे, भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर धारावीतील राष्ट्रीय काँग्रेस, मनसेच्या विविध पदाधिकाकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबईतील भाजप उपाध्यक्ष राजू तिकोने, नेरूळचे महामंत्री शशिकांत मोरे, वॉर्ड अध्यक्ष भरत म्हात्रे, नेरूळ भाजप उपाध्यक्ष सोनपा घोलप, ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख प्रतापसिंह विसाळ, माजी विभागप्रमुख सुनील हुंडारे, मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नायकडे, युवा सचिव ऋषिकेश भुजबळ, तालुका सचिव अक्षय शिरगावकर, वॉर्ड अध्यक्ष सुजित भोर, सागर जोगाडिया, आशिष कदम, गुरुदास गर्जे, अमित पवार आणि इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सुरेश मोगला, जयेश मुदलीयार, मुंबई युवक काँग्रेसचे महासचिव विकी व्हटकर, धारावी विधानसभा उपमुख्य समन्वयक विनायक पोळ, रोशन शेख, महेश तावरे, धारावी काँग्रेसचे दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शिवलिंग व्हटकर आणि इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तर मनसेच्या विभाग सचिव सविता बोबडे, दीपक नारायणे, राजेश कुमार पारयार, धनाशेखर पारयार, सुरेश बेडगिरी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेवक नामदेव भगत, काशीनाथ पवार तसेच शिवसेनेचे धारावी आणि नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.