
प्रांजल खेवलकरविरोधात आणखी एक गुन्हा
संमतीशिवाय महिलेचे फोटो, व्हिडिओ काढल्याचा आरोप
पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा
रेव्ह पार्टी प्रकरणात आधीच कोठडीत असलेले खेवलकर अडचणीत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील खराडी रेव्ह पार्टीप्रकरणात प्रांजल खेवलकर कोठडीत आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. प्रांजल खेवलकरच्या मोबाइलमध्ये शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडीओ आढळले, असे आरोपही त्यांनी केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
प्रांजल खेवलकरचा पाय आणखी खोलात अडकला आहे. पुण्यात त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. येथील सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका महिलेने तक्रार केली होती. त्यानुसार सायबर पोलिसांत आयटी अॅक्ट 66E , BNS 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरून व्हिडिओ काढल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. सहमती नसताना फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी खेवलकरवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.