Ulhasnagar News: विद्यार्थ्यांना साधं वाचता येईना, शिक्षिका जबाबदार; आयुक्तांनी थेट नोटीस धाडली

Ulhasnagar Education Crisis: उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक ८, २३ आणि २९ ला आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी शिक्षिकेला नोटीस पाठवली.
Ulhasnagar School
Ulhasnagar Education NewsSaam Tv
Published On

अजय दुधाणे, उल्हासनगर

विद्यार्थ्यांना वाचता आलं नाही त्यामुळे आयुक्तांनी थेट शिक्षिकेला नोटीस पाठवल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. उल्हासनगरात आयुक्तांकडून महापालिका शाळांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी शाळांची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्याची त्यांनी तंबी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा केला. यावेळी काही विद्यार्थ्यांना वाचताही न आल्यानं त्याचा पारा चढला. याला शिक्षिका जबाबदार असल्याने आयुक्तांनी थेट शिक्षिकेलाच नोटीस बजावली. विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला.

उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक ८, २३ आणि २९ ला आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली. यात शाळा क्रमांक ८ मध्ये विद्यार्थ्यांना साधी पाठ्यपुस्तकं सुद्धा वाचता येत नसल्याचं निदर्शनास येताच आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी थेट तिथल्या संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली.

Ulhasnagar School
Ulhasnagar Crime: चोरीसाठी नग्न होऊन आला, दुकानातील मोबाईल चोरले; जाता जाता तिथेच शौच करून गेला

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आयुक्तांनी दिला. आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या या कारवाईमुळे पालिकेच्या शाळांमध्ये केवळ पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांचे धाबे मात्र दणाणले आहेत. आयुक्तांनी अचानक शाळांना भेट दिल्यामुळे आणि शिक्षिकेला नोटीस पाठवल्यामुळे आता याची शिक्षण विभागात सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.

Ulhasnagar School
Ulhasnagar News : १०८ रुग्णवाहिकेचा गरिबांच्या आरोग्याशी खेळ; दुपारी कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका सायंकाळी दाखल, रुग्णाचा मृत्यू

दरम्यान, मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मराठवाड्यातील तब्बल ३० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साधं एखादा मराठी वाक्य वाचता येत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले होते. तर २८ टक्के विद्यार्थ्यांना संख्याज्ञान नसल्याचे देखील समोर आले होते. त्यामुळे त्याठिकाणी देखील विभागीय आयुक्तांनी पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. नांदेड जिल्ह्यात ही भीषण परिस्थिती असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले होते.

Ulhasnagar School
Ulhasnagar Crime : दुचाकीवरून येत मोबाईल हिसकावून ठोकली धूम; उल्हासनगरात पहाटेची घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com