वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर कसा गेला ? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis saam tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Devendra Fadnavis News : वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील विरोधीपक्षातील नेत्यांनी शिंदे सरकारवर चौफेर टीका केली. प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. याच वेदांता प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. आता वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर कसा गेला ? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे

Devendra Fadnavis
वेदांत-फॉक्सकॉन पाठोपाठ आता आणखी एक प्रकल्प राज्यातून बाहेर जाणार, शिंदे सरकारला माहितेय का?, आदित्य ठाकरे म्हणाले...

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील 'एमसीसीआयए'च्या कार्यलयात वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं. एमसीसीआयएच्या वार्षिक सभेच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. या वार्षिक सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता प्रकल्पावर देखील भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता, तो प्रकल्प आधीच गुजरातला (Gujrat) गेला. आम्ही वेदांता प्रकल्पासाठी प्रयत्न केले'

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री असणारे अनिल देशमुख जेलमध्ये गेले आहेत'. तर फेक माथाडी करणाऱ्यांवर देखील फडणवीस यांनी भाष्य केलं. 'काही उद्योजकांनी फेक माथाडी करणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. मी पोलिसांना सांगून फेक माथाडी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावणार आहे'.

Devendra Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'बेटी बचाव बेटी पटावो' अभियान राबवायला हवं; पटोलेंची जहरी टीका

'पुणे-नाशिक हायस्पीड ट्रेनबाबत विचार सुरू आहे. पुणेकर पाण्याचा खूप वापर करतात. पुण्यात २४ बाय ७ पूर्ण प्रेशरने पाणी पुरविण्याचा विचार आहे. तर नदी सुधार प्रकल्पामुळे प्रदूषण कमी होईल. पुण्याच्या भविष्यातील पाण्याचा विचार केला आहे. पुण्यातील संस्थामध्ये 'आयआयटी' आणि 'आयआयएम' पेक्षा जास्त ताकद आहे', असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com