'दोन वर्षात राज्याला गुजरातच्या...'; वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून फडणवीसांची विरोधकांवर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis saam tv
Published On

सूशांत सावंत

Devendra Fadnavis News : वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजराजला गेल्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राज्यभरात विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. राज्य सरकारला या मुद्यावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात महाराष्टाला गुजरातच्या मागे नेले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis ) विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

Devendra Fadnavis
शिवसैनिकांनो घाबरु नका; दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ; दानवेंचं शिंदे गटाला आव्हान

वेदांता-फॉक्सकॉनाच्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकारणावरूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा मोठा वाटा मोठा आहे. मात्र आपल्याकडे रिफायनरीलाच विरोध करण्यात आला. मी अनिल अग्रवाल यांच्याशी बोललो. त्यांनी गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देतो असे म्हणालो. तोपर्यंत त्यांचा गुजरातसोबत करार झाला होता. आमचे सरकार येण्याआधी तो करार झाला होता'.

'आता ते बोलू लागले आहे, अरे तुमचे कर्तृत्व तरी सांगा. महाविकास आघाडीने दोन वर्षात राज्याला गुजरातच्या मागे नेले. पण आम्ही पुढे घेऊन जाणार आहे. आम्ही पहिल्या क्रमांकाला महाराष्ट्राला घेऊन जाऊ', असे फडणवीस पुढे म्हणाले.

Devendra Fadnavis
Chandrakant Patil | नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिक्षणाचे भगवीकरण होतंय का ? चंद्रकांत पाटील म्हणाले...

'आपल्या सर्व अर्थव्यवस्थेचा कणा लघु उद्योग आहेत. आपण जेव्हा मोठ्या उद्योगाचा विचार करतो, तेव्हा संपूर्ण पुरकता ही लघु उद्योगातून येते. कोरोना काळात देखील आपण लघु उद्योग जगला पाहिजे यासाठी पाठबळ देण्याचे काम मोदींनी केले. राज्यात देखील लघु उद्योगाला बळ देणे हा आमचा प्रयत्न आहे. जागतिक पुरवठा साखळीचा भाग होण्यासाठी मोठी संधी आपल्या उद्योगांना मिळत आहे. रशियाला चीनवर विश्वास नाही, त्यामुळे भारताला मोठी संधी आहे. कोरोनानंतर चीनवरचा पश्चिम राष्ट्राचा विश्वास कमी झाला,त्यामुळे भारतावर या राष्ट्राचा विश्वास आहे', असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com