Dust Storm : धुळीच्या वादळाने पालघर, डहाणू, सफाळे परिसर प्रदूषणाच्या विळख्यात!

पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्राला बसत आहे.
Dust Storm
Dust Storm SaamTVNews

-- रुपेश पाटील

पालघर : पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्राला बसत आहे. गुजरातमार्गे आलेल्या धुळीचे साम्राज्य गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पसरले असून त्यामुळे वातावरण प्रदूषित झाले. गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे.

हे देखील पहा :

आज पाकिस्तानातून (Pakistan) सुटलेले वादळ (Cyclone) महाराष्ट्रावर धडकले आहे. पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई (Mumbai), पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. मुंबई - पुण्यात (Pune) धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद केली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.

Dust Storm
शिरूर हादरलं! विधवा महिलेवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार

हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाहीये. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. सफाळे परिसरात देखील धुळीचे वातावरण (Environment) निर्माण झाल्याने नागरिकांना मास्क (Mask) घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. हे वातावरण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com