मावळ : मावळ (Maval) मधील नायगाव गावच्या हद्दीमध्ये इंद्रायणी नदीपात्रात बुडून माय लेकरांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनम शिंदे वय वर्ष ३८ व युवराज शिंदे वय १४ दोघेही राहणार कामशेत, अशी या मृतांची नावे आहेत.
कामशेत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, शिंदे माय लेक इंद्रायणी नदीपात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवराज हा पाण्यात पडला त्याला वाचविण्यासाठी आई पूनम हिने पाण्यात उडी मारली.
ते दोघेही पाण्यात बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी पूनम यांच्या भावाने त्या दोघांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी कामशेत येथील एका खाजगी रूग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. घटनेचा पुढील तपास कामशेत पोलिस करत आहेत. मात्र, मायलेकावर ओढावलेल्या या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Edited By - Jagdish patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.